The Bombay Stock Exchange plunged after a sharp fall in global markets
जागतिक बाजारातल्या मोठया पडझडीनंतर मुंबई शेअर बाजार गडगडला
मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज अडीच टक्क्याहून अधिक घसरण झाली. जागतिक शेअर बाजारातील मोठ्या पडझडीनंतर देशाअंतर्गत शेअर बाजारात महत्वाचे समभाग घसरले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४९१ अंकांची घसरण होऊन तो दिवसअखेर ५२ हजार ८४३ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३८२ अंकांच्या घसरणीसह १५ हजार ८६३ अंकांवर बंद झाला. चलन बाजारात आज रुपयाच्या मूल्यात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली. रुपयाचे मूल्य आज ८१ पैशांनी घसरले आणि ते ७७ रुपये प्रति डॉलर झाले.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात तीव्र वाढ होऊन ते १३० डॉलर्स प्रति बॅरेल झाल्यामुळे महागाई वाढली आणि देशाच्या व्यापार आणि चालू खात्यातील तूट यांच्यातील तफावत वाढली.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अमेरिकी डॉलरकडे गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे रुपयाच्या किंमतीत घसरण झाली.