विजय माल्या, निरव मोदी, आणि मेहुल चोक्सी प्रकरणातील १८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं बँकांना दिले परत

The Centre has informed Supreme Court that 18 thousand crores have been returned to the banks in Vijay Mallya, Nirav Modi, and Mehul Choksi cases.

विजय माल्या, निरव मोदी, आणि मेहुल चोक्सी प्रकरणातील १८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं बँकांना दिले परत

नवी दिल्ली: विजय माल्या, निरव मोदी, आणि मेहुल चोक्सी प्रकरणातील १८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं बँकांना परत दिले. सक्तवसुली संचालनालयाच्यावतीनं केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहताVijay Mallya-Nirav Modi-Mehul Choksi यांनी ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लौंड्रिंग प्रकरणात न्यायालयासमोर प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची एकूण रक्कम ६७ हजार कोटी रुपये आहे, तर आजपर्यंत चार हजार सातशे प्रकरणांची चौकशी संचालनालयाकडून केली गेली, असं मेहता म्हणाले. गेल्या ५ वर्षात प्रत्येक वर्षी तपाससाठी घेतलेल्या प्रकरणांची संख्या १११ वरून यावर्षी ९८१ एवढी झाली आहे अशी माहिती मेहता यांनी यावेळी दिली.

सुप्रीम कोर्टात अनेक याचिकांवर सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये ED ला शोध, जप्ती, तपास आणि कायद्यांतर्गत गुन्ह्यातील रक्कम संलग्न करण्याच्या विस्तृत अधिकारांना आव्हान दिले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *