The distribution of drugs for Mucormycosis is now through District Surgeon, Pune.
In the Pune district, the number of patients suffering from Mucormycosis is increasing day by day. Amphotericin B drug deficiency was observed to be severe. Amphotericin B drug deficiency was observed to be severe. Therefore, as per the letter from Hon’ble Commissioner, Director of Health Services and Campaign, National Health Mission, the distribution of these medicines received from District Surgeon, Pune for private hospitals in Pune district will be done by the District Collector Pune office from 20/05/2021 to 30/05/2021 as per the availability. In addition to this medicine, other medicines for Mucormycosis have also been distributed as per the demand of the hospitals. For this, the office has registered the demand through the hospital on the Google form link https://tinyurl.com/mmdpdh and the medicines have been distributed according to the availability. The allocation has been made separately for government hospitals through District Surgeons.
However, according to the letter dated 26/2021 from the Hon’ble Commissioner, Director of Health Services and Mission, National Health Mission, Inj on Mucormycosis,. The procedure for distribution of Amphotericin B has been decided, according to which the District Surgeon, Pune is to distribute the drug as per the availability and demand of the hospital. The government has directed to distribute free medicine to the patients of government and municipal hospitals as well as to the patients under Mahatma Phule Jan Arogya Yojana and to sell the medicine to private hospitals as per the said letter. Private hospitals are required to submit the following information/documents to the District Surgeon, Pune in order to apply.
- Including the patient’s full name, age and weight.
- Mucormycosis Diagnosis Test Report
- Copy of patient’s Aadhar card
- A demand letter from the hospital for the injection required for the patient and 5. Guarantee that the injection will be used for the same patient.
Inj on Mucormycosis disease Dr Varsha Doiphode (Mo. No. 9130675303), Assistant District Surgeon, Pune is the Nodal Officer for Distribution of Amphotericin B for Pune District. The control room telephone no. No. 020-29700041. The medicine will be made available daily from 09.30 am to 6.30 pm at the District Surgeon, Pune District Hospital, Aundh, Pune. Hospitals are required to register the demand with the above information on the Google form link https://tinyurl.com/mmdpdh. Medicines will be distributed to the hospital as per the demand as the availability of medicines. Inj. Other drugs for mucosal mycosis besides amphotericin B 1) Posaconazole 300mg Inj. 2) Isavuconazole 372 mg Inj. 3) Isavuconazole 186 mg Inj. 4) Posaconazole Tab. 5) Posaconazole Liquid. The medicines are also being made available through the Collectorate, Pune after registering the demand on the above link.
Inj on Covid 19 Illness. Remdesivir is also being distributed through Collectorate, Pune after requesting on this link. Today, a total of 602 patients suffering from Mucormycosis have been treated in the district through the District Collector’s Office, Pune and District Surgeon, Pune. Amphotericin B is distributed.
म्युकर मायकोसिस आजारावरील औषधाचे वितरण आता जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे यांचेमार्फत.
पुणे जिल्ह्यामध्ये म्युकर मायकोसिस या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या वरील Inj. Amphotericin B औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचेकडील पत्रानुसार पुणे जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे यांचेकडून प्राप्त सदर औषधांचे वाटप हे जिल्हाधिकारी पुणे कार्यालयामार्फत दिनांक २०/०५/२०२१ ते दि.३०/०५/२०२१ पर्यंत उपलब्धतेनुसार करण्यात आले आहे. सदर औषधा व्यतिरिक्त म्युकर मायकोसिस आजारावर इतर औषधांचे देखिल वाटप रूग्णालयांचे मागणीनुसार करण्यात आले आहे. यासाठी या कार्यालयामार्फत https://tinyurl.com/mmdpdh या Google form link वर रूग्णालयामार्फत मागणी नोंदविण्यात येऊन उपलब्धतेनुसार औषधे वाटप करणत आले आहे. शासकीय रूग्णालयांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेमार्फत वाटप स्वतंत्ररित्या करण्यात आले आहे.
तथापि, मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचेकडील पत्र अन्वये म्युकर मायकोसिस आजारावरील Inj. Amphotericin B या औषध वितरणाची कार्यपध्दती निश्चित केली असून त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक पुणे यांनी औषध उपलब्धतेनुसार व रुग्णालयाचे मागणीनुसार सदर औषधाचे वितरण करण्याचे आहे. शासकीय व महानगरपालिकेच्या रूग्णालयातील रूग्णांसाठी तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रूग्णांसाठी मोफत औषध वाटप करण्याचे असून खाजगी रूग्णालयांना सदर औषधाची विक्री उक्त नमूद पत्रानुसार वाटपाचे निर्देश शासनाने दिले आहेत. मागणी करण्यासाठी खाजगी रूग्णालयांनी खालील माहिती / कागदपत्रे जिल्हा शल्य चिकित्सक पुणे यांचेकडे सादर करणेची आहेत.
१. रूग्णाचे संपुर्ण नाव, वय व वजन यासह.
२. Mucormycosis निदान झाल्याचा चाचणी अहवाल (Report)
३. रूग्णाचे आधार कार्ड ची प्रत
४. रूग्णालयाकडून रूग्णासाठी लागणा-या इंजेक्शनसाठी मागणीपत्र व ५. सदरील इंजेक्शन त्याच रूग्णासाठी वापरण्यात येईल असे हमीपत्र.
म्युकर मायकोसिस आजारावर Inj. Amphotericin B चे वितरणा करीता पुणे जिल्ह्याकरिता डॉ. सौ. वर्षा डोईफोडे (मो. क्र. ९१३०६७५३०३), सहा जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे या नोडल ऑफिसर आहेत. तेथील नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्र. क्र. ०२०-२९७०००४१ असा आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे येथिल औषध भांडार येथे सदर औषध दररोज सकाळी ०९.३० ते सायं.६.३० या वेळेत उपलब्ध करून दिले जाईल. रूग्णालयांनी वरील माहितीसह मागणी https://tinyurl.com/mmdpdh या Google form link वर नोंदविणे आवश्यक असून औषध उपलब्ध करून घेणेसाठी प्राधिकार पत्रासह संबंधित व्यक्तीने जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे संपर्क साधावा. औषध उपलब्धतेनुसार सदर रूग्णालय यांना मागणीचे अनुषंगाने औषध वितरण करण्यात येईल. Inj. Amphotericin B व्यतिरिक्त म्युकर मायकोसिस आजारावरील इतर औषधे 1) Posaconazole 300mg Inj. 2) Isavuconazole 372 mg Inj. 3) Isavuconazole 186 mg Inj. 4) Posaconazole Tab. 5) Posaconazole Liquid. औषधांचे देखिल जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे मार्फत वरील लिंकवर मागणी नोंदविल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
कोविड १९ आजारावरील Inj. Remdesivir ची मागणी देखिल सदर लिंकवर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे मार्फत वितरण करण्यात येत आहे. आज अखेर पुणे जिल्ह्यातील म्युकर मायकोसिस आजारावरील एकुण ६०२ रुग्णांना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे व जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे यांचेमार्फत ५३०४ एवढ्या Inj. Amphotericin B चे वितरण करण्यात आले आहे. पुणे जिल्यातील एकुण ६२५ कोविड १९ रुग्णालयांमध्ये आज अखेर एकुण १७८३०३. रेमडेसिवीर इंजेक्शन्स वाटप करण्यात आले आहेत.