The examination for the third year of Microbiology will now be held on Monday 17th May.

The examination for the third year of Microbiology will now be held on Monday 17th May.

 Savitribai Phule Pune University has canceled the third year BSc Microbiology examination held on Monday due to technical reasons. The exam will be held again on May 17 from 12 noon to 2 pm. Mahesh Kakade, Director, Examination Evaluation Board, University, has issued a circular in this regard. The TY BSc MicroBiology exam was conducted by the University of Pune, but some students had complained that in this online exam, students were asked questions in the second semester instead of in the syllabus of that semester. This matter was brought to the notice of the examination department by Ukraine.

 Asking questions from other sessions in the exams conducted by the university increased the pressure of the students and they also demanded to retake the exams. Meanwhile, the students were relieved when the examination department announced on Tuesday that a re-examination would be held through a circular in this regard. The examination department has also clarified that all the principals should bring to the notice of the students that the examination of Paper No. 6 in the subject of Microbiology will be held again. It is also mandatory for all students enrolled in Microbiology Theory Paper-VI (Sem-II) to take this test. Login IDs and passwords previously sent to students will remain the same or will not change.

मायक्रोबायोलॉजी तृतीय  वर्षाची परीक्षा आता येत्या सोमवारी दिनांक १७ मे रोजी.  

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सोमवारी दिनांक दहा घेतलेल्या बीएससी च्या तृतीय वर्षातील मायक्रोबायोलॉजी विषयाची परीक्षा तांत्रिक कारणामुळे रद्द केली आहे.  ही परीक्षा पुन्हा 17 मे रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी याबाबतचे  परिपत्रक प्रसिद्ध केले आहे . पुणे विद्यापीठामार्फत टी वाय बीएस्सी मायक्रो बायोलॉजी या विषयाची परीक्षा घेण्यात आली,  मात्र या ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना त्या सत्रातील अभ्यासक्रमातील प्रश्न विचारण्या ऐवजी दुसऱ्या सत्रातील प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली होती .  ही बाब युक्रांत या संघटनेने ही परीक्षा विभागाच्या निदर्शनास आणून दिली.   

 विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत अन्य सत्रातील प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली तसेच ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती.  दरम्यान मंगळवारी परीक्षा विभागाने याबाबत परिपत्रकाद्वारे पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याचे  जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  मायक्रोबायोलॉजी विषयाचा पेपर क्रमांक सहा याची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची बाब सर्व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावी असेही परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच  मायक्रोबायोलॉजी थिअरी  पेपर-VI (सेम-II) या विषयासाठी नावनोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेस भाग घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना आधी पाठविलेले लॉगिन आयडी आणि पासवर्ड  पूर्वीप्रमाणे राहतील किंवा त्यात बदल होणार नाही.    

 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *