Distribution of medical equipment such as ventilators, oxygen concentrators to Covid Hospitals by Deputy Chief Minister Ajit Pawar
The fight against Covid is a great strength due to the cooperation of social organizations – Deputy Chief Minister Ajit Pawar
The cooperation of all and the cooperation of social organizations are important in facing the Corona crisis in the state. Deputy Chief Minister Ajit Pawar expressed confidence that the fight against corona would be strengthened in the state, including Covid Hospitals, Ventilators, and Oxygen Concentrators for Covid Center, by the medical equipment provided by London based Arvindji Shah and Mukul Madhav Foundation. In the committee hall of the Deputy Chief Minister’s Office, On behalf of Dr. Arvind Shah (London) and Mukul Madhav Foundation, Deputy Chief Minister Ajit Pawar today distributed medical equipment like ventilators, oxygen concentrators for Covid Hospitals, Covid Center. At this time, the Divisional Co-Registrar R. C. Shah as well as other dignitaries were present.
Deputy Chief Minister Ajit Pawar said, The help sent by Dr.Arvind Shah, Mukul Madhav Foundation, British Association of Physicians of Indian Origin, for the patients in rural areas of the country, Maharashtra is strengthening the fight against corona. Deputy Chief Minister Ajit Pawar instructed to take care that this medical aid reaches the patients properly. . He interacted with Arvind Shah through VC and thanked and congratulated him.
Deputy Chief Minister Ajit Pawar distributed medical equipment to the rural hospital at Akole in Ahmednagar district, Ashwin Rural Ayurvedic Hospital of Eklavya Adivasi Sanstha in Sangamner taluka, Manchi Hill, Jeevadaya Mandal, Sangamner Nagar Parishad Cottage Hospital, Sassoon Hospital in Pune, Matrubhumi Pratishthan’s Jagdale Mama Hospital in Barshi in Solapur district.
व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड रुग्णालयांना वितरण.
सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे कोविड विरोधी लढ्याला मोठी ताकद – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यावरील कोरोना संकटाचा सामना करताना सर्वांची एकजूट आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्वाचे आहे. लंडन येथील अरविंदजी शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या वतीने राज्यातील कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांमुळे राज्याच्या कोरोनाविरोधी लढ्याला ताकद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ. अरविंद शाह (लंडन) तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विभागीय सहनिबंधक आर. सी. शाह तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, डॉ. अरविंद शाह, मुकुल माधव फाऊंडेशन, ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन यांनी देशातील, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रुग्णांना पाठविलेली मदत कोरोनाविरोधी लढ्याला ताकद देणारी आहे. ही वैद्यकीय मदत रुग्णापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याबाबतची काळजी घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच लंडन येथील डॉ. अरविंद शाह यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले, अभिनंदन केले.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ग्रामीण रुग्णालय, संगमनेर तालुक्यातील एकलव्य आदिवासी संस्थेचे अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालय, मांची हिल, तसेच जीवदया मंडळ, संगमनेर नगरपरिषद कॉटेज हॉस्पिटल, पुण्याचे ससून रुग्णालय, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे जगदाळे मामा हॉस्पिटल आदी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सभागृहात, डॉ.अरविंद शाह (लंडन) तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने, कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.