The final voter list will be released on January 23
अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी, २०२४ (सोमवार) असा होता. तथापि, राज्य शासनाने १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी, २०२४ (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार”