युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेर्नित्सीहून रोमानियाच्या सीमेकडे रवाना

The first batch of Indian students stranded in Ukraine leaves Chernivtsi for the Romanian border

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेर्नित्सीहून रोमानियाच्या सीमेकडे रवाना

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेर्नित्सीहून रोमानियाच्या सीमेकडं रवाना झाल्याची माहिती काल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे.

Photo by newsonair

भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, परराष्ट्र मंत्रालयाचं शिबीर कार्यालय पश्चिम युक्रेनमधील एलव्हिव्ह आणि चेरनिव्हत्सी शहरांमध्ये कार्यरत झाले आहेत.

इथं अतिरिक्त रशियन भाषिक अधिकारी पाठवले जात असून, या शहरांमध्ये पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनलगतच्या अन्य देशांच्या सीमा ओलांडून तिथं सुरक्षित आश्रय घेण्यासाठी हे अधिकारी मदत करत आहेत. यासाठी हंगेरी, पोलंड आदी देशांमध्ये भारतीय अधिकाऱ्यांची पथकं पाठवण्यात आली आहेत.

भारतियांनी या पथकाशी संपर्क साधावा, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयानं दिल्या आहेत. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सद्य परिस्थितीत युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय अडकलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तातडीनं उपाययोजना करत आहे, असं भारताचे युक्रेनमधले राजदूत पार्थ सत्पथी यांनी म्हटलं आहे.

क्यीवमधील भारतीय दूतावासाने नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केले आहेत.

युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठीचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी काल युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. भारतीय नागरिक, विद्यार्थी यांच्या सुरक्षित सुटकेसाठी देत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशंसा केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *