The first ‘Child Covid Testing Center’ in the state will be set up in Hadapsar: MLA Chetan Tupe.
As a precautionary measure, the third wave of the corona is expected to hit children, MLA Chetan Tupe said, adding that Hadapsar would be the first constituency in the state to set up its first Covid testing center for children in Hadapsar. Hadapsar Medical Association experts interacted with MLA Chetan Tupe on the background that the third wave of the Covid19 epidemic is predicted to affect children. The action plan prepared in the doctor’s meeting. During the meeting, issues like ventilators for children, separate beds for children, additional manpower, drug treatment, etc, and reservation of 100 beds in Jumbo Covid Center for children were discussed.
The action plan was prepared on issues like CSR, mobilization of funds, and use of MLA funds for the purchase of High Flow Machine for children. Dr. Shantanu Jagdale, Dr. Dole, Dr. Santosh Kumar Shinde, Dr.Smita Shinde, Dr. Pote, Dr. Prashant Chaudhary, Dr. Anil Khamkar, Dr. Jitendra Deshmukh, Dr. Mahindrakar, Dr. Mahesh Shinde, Dr. Durvas Kurkute, Dr. Nilesh Waghmare, Dr. Rahul Zhanzurne, etc. were present on this occasion.
राज्यातील पहिले ‘चाईल्ड कोविड टेस्टिंग सेंटर’ हडपसर मध्ये उभारणार: आमदार चेतन तुपे
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने खबरदारी म्हणून आमदार चेतन तुपे यांनी हडपसर येथे लहान मुलांसाठी याचे पहिले कोविड टेस्टिंग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे तसेच लहान मुलांच्या उपचारांसाठी कृती कार्यक्रम राबविणारा हडपसर हा राज्यातील पहिलाच मतदारसंघ असेल असे सांगितले . कोविड19 महामारीच्या तिसर्या लाटेत लहान मुलांमध्ये प्रादुर्भाव होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, या पार्श्वभूमीवर हडपसर मेडिकल असोसिएशन तज्ञांनी आमदार चेतन तुपे यांच्याशी संवाद साधला. यावेळी लहान मुलांसाठी वापरात येणारे व्हेंटिलेटर, मुलांसाठी स्वतंत्र बेड अशी व्यवस्था, अतिरिक्त मनुष्यबळ, औषध उपचार आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
लहान मुलांसाठी जंबो कोविड सेंटर मध्ये 100 बेड राखीव ठेवणे लहान मुलांच्या High Flow मशीन विकत घेण्यासाठी सीएसआर, लोकवर्गणी व आमदार निधीचा उपयोग करणे आदी मुद्यांनुसार कृती कार्यक्रम आखण्यात आला. यावेळी डॉ शंतनू जगदाळे, डॉ डोळे, डॉ संतोष कुमार शिंदे,डॉ स्मिता शिंदे, डॉ पोटे डॉ प्रशांत चौधरी,डॉ अनिल खामकर, डॉ जितेंद्र देशमुख, डॉ महिंद्रकर डॉ महेश शिंदे, डॉ दुर्वास कुरकुटे, डॉ नीलेश वाघमारे, डॉ राहुल झांजुर्णे आदी उपस्थित होते.