गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल

The garment cluster will work to empower women in the state – Dr. Neelam Gorhe गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल – डाॅ.नीलम गोऱ्हे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The garment cluster will work to empower women in the state – Dr. Neelam Gorhe

गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल – डाॅ.नीलम गोऱ्हे

धामणगाव देव येथे गारमेंट क्लस्टरचे उद्घाटन

500 महिलांना मिळणार हक्काचा रोजगार

महिलांसाठी राज्यातील पहिलेच क्लस्टर

यवतमाळ : महिलांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु, पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून धामणगाव देव येथे केवळ महिलांसाठी सुरु करण्यात आलेले गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल, असे विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.The garment cluster will work to empower women in the state – Dr. Neelam Gorhe
गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल – डाॅ.नीलम गोऱ्हे
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जिल्हा वार्षिक योजना, महिला व बालविकास विभागाच्यावतीने ३ टक्के निधीमधून महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारीत गारमेंट क्लस्टर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. महिला कर्जाची परतफेड नियमितपणे करत असल्याने बॅंका देखील महिलांना मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देतात. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील विविध प्रकारचे उपक्रम राबवित असल्याचे डॅा.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी धामणगाव देव येथे दारव्हा तालुक्यातील 500 महिलांना या क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. असेच क्लस्टर दिग्रस व नेर येथे देखील उभे राहणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात बचतगटांना ई-रिक्षा देण्यात येणार असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी तसेच महिलांच्या कल्याणासाठी काम केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना सिंचन, वीजेच्या पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्याहस्ते बचतगटाच्या महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. गाव विकास समितीच्या अध्यक्ष व सचिवांचा सत्कार देखील करण्यात आला. या क्लस्टरमध्ये प्रशिक्षक म्हणून नेमन्यात आलेल्या युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आले. माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॅा. रंजन वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण

Spread the love

One Comment on “गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *