The filing of nomination forms for the second phase of the general election will begin from tomorrow
सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून होणार सुरुवात
भारतीय निवडणूक आयोगाकडून दुसऱ्या टप्प्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून होणार सुरुवात
या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 88 संसदीय मतदारसंघात आणि मणिपूरमधील एका संसदीय मतदारसंघामधील (बाह्य मणिपूर)एका भागामध्ये मतदान होणार
दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी अर्ज 4 एप्रिल 2024 पर्यंत भरता येणार
जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त इतर सर्व 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 एप्रिल 2024 रोजी तर जम्मू आणि काश्मीरमध्ये 6 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार
नवी दिल्ली : सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक लोकसभा 2024 साठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 88 संसदीय मतदारसंघांसाठी राजपत्र अधिसूचना 28.03.2024 रोजी जारी केली जाईल.या 88 संसदीय मतदारसंघ आणि मणिपूर (बाह्य मणिपूर) मधील एका संसदीय मतदारसंघातील एका भागासह दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26.04.2024 रोजी होईल. बाह्य मणिपूर संसदीय मतदारसंघामधील निवडणुकीची अधिसूचना पहिल्या टप्प्यासाठी जारी करण्यात आलेल्या राजपत्र अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आली होती.19.04.2024 रोजी बाह्य मणिपूर संसदीय मतदारसंघामध्ये 15 विधानसभा मतदारसंघात (टप्पा 1) मतदान होणार आहे आणि याच संसदीय मतदारसंघातील 13 विधानसभा मतदारसंघात 26.04.2024 (टप्पा 2) रोजी मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि मणिपूरमधील एका संसदीय मतदारसंघामधील एक भाग (बाह्य मणिपूर) समाविष्ट आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून होणार सुरुवात”