The good news. State’s recovery rate at 95 percent.
Today, for the first time in three months, the lowest number of corona patients have been diagnosed.
The recovery rate of corona patients in the state has gone up to 95 percent for the first time in the last three months. Today, 21 thousand 776 patients of Corona were cured and released at home. So far, a total of 55 lakh 28 thousand 834 people have been released from Corona.
Meanwhile, for the first time in three months, at least 13,659 corona patients were diagnosed today. On March 10, 2021, the same number of patients were found today. Since then, the number of patients has been steadily increasing day by day.
At present, the number of active patients in the state has also reached 1 lakh 88 thousand 027.
- Recorded deaths of 300 corona infected patients in the state today. At present, the death rate in the state is 1.71 percent.
- Out of 3 crores, 6 lakh 71 thousand 483 laboratory samples tested to date, 58 lakh 19 thousand 224 (16.04 percent) samples have tested positive.
- At present 14,00,052 persons are in Home Quarantine and 7,093 persons are in Institutional Quarantine in the State.
आनंदाची बातमी. राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर.
तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान.
राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात कमी १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. दि.१० मार्च २०२१ रोजी आजच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती.
सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील १ लाख ८८ हजार ०२७ इतकी झाली आहे.
- राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६२ लाख ७१ हजार ४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख १९ हजार २२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.