The hearing on the merger of ST workers will be held next Friday
एस टी कामगारांच्या विलिनिकरणाबाबतची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार
मुंबई: एस टी कामगारांच्या विलिनिकरणाबाबतची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे, परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज बातमिदारांना ही माहिती दिली. राज्य सरकारनं नेमलेल्या समितीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला होता. या अहवालावर आज सुनावणी होणार होती.
विलनिकरण सोडून उर्वरीत सर्व मागण्या मान्य केल्याचं परब यांनी सांगितलं. एस टी कर्मचाऱ्यांचे पगार कापल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांवर फिरत आहेत. या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं परब म्हणाले. सर्व कामगारांनी पुन्हा सेवेत रुजू व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
संपामुळं झालेलं नुकसान कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचा कोणाताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळाचं स्पष्टीकरण
एसटी संपामुळं महामंडळाचं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. काही माध्यमांनी यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही किंवा विचाराधीनही नाही अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली आहे. अशा तथ्यहीन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवु नये आणि संपकरी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर रुजू व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं.