विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व नागरिक तथा प्रशासनाचे अभिनंदन

The immersion procession in the Sasane Nagar area of Hadapsar concluded with a gaiety हडपसर ससाणे नगर भागात विसर्जन मिरवणुका जल्लोषात संपन्न हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Congratulations to all citizens and administration for conducting the immersion procession peacefully

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व नागरिक तथा प्रशासनाचे अभिनंदन

मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ मंडळाचे पालकमंत्र्यांकडून विशेष अभिनंदन

Guardian Minister Chandrakantada Patil पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

पुणे : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गुरुवारी अनंत चतुर्दशीला सकाळी सुरु झालेली गणेश विसर्जन मिरवणूक २८ तास ४० मिनिटांनी संपली. ही मिरवणूक अतिशय शांततेत संपन्न झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व गणेशभक्त, पोलीस प्रशासन, महापालिका अधिकारी व कर्मचारी, पत्रकार मित्र यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेही पालकमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण महाराष्ट्रात वेगळेच आकर्षण असते. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहरात येत असतात. त्यामुळे ही मिरवणूक अतिशय शांततेत पार पाडावी, यासाठी पोलीस प्रशासन कठोर परिश्रम घेत असतात. यंदा पुण्याची गणेश मिरवणूक २८ तास ४० मिनिटे चालली. या मिरवणूक काळात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. त्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

तसेच, यंदा गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपवावी यासाठी मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ गणपती मंडळाने लवकर मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. दगडूशेठ गणपती मंडळाने दुपारी ४ वाजताच मिरवणुकीत सहभागी होण्याचा दिलेल्या शब्दाचे तंतोतंत पालन केले. तसेच ८ वाजून ५० मिनिटांनी गणपतीचे विसर्जन झाले.

पुण्यातील विसर्जन मिरवणूक इतिहासात मानाच्या गणपतींसह दगडूशेठ गणपती मंडळाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, इतर मंडळांनीही पुढील वर्षी पुण्याची प्रदीर्घ काळ चालणारी मिरवणूक लवकर संपण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

दरम्यान, विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनीदेखील मिरवणुकीदरम्यान विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. नागरिकांनी मिरवणुकीचा आनंद घेताना प्रशासनाला चांगले सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेली ही मिरवणूक शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडली, असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता
Spread the love

One Comment on “विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व नागरिक तथा प्रशासनाचे अभिनंदन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *