ग्राम स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायती राज व्यवस्थेचं महत्व लक्षणीय

The importance of the Panchayati Raj system is significant for fulfilling the dream of village self-government –  Prime Minister

ग्राम स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायती राज व्यवस्थेचं महत्व लक्षणीय – प्रधानमंत्रींचं प्रतिपादन

अहमदाबाद : ग्राम स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायती राज व्यवस्थेचं महत्व लक्षणीय आहे, पंचायत राज व्यवस्थेत जलदगतीनं सुधारणा होत आहेत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्तPrime Minister Narendra Modi केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात आज त्यांनी गुजरात पंचायत महासंमेलनात पंचायत राज संस्थेतल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. गुजरात ही महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमी असून त्यांच्या स्वप्नातल्या भारताच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले.

महात्मा गांधींचं मुख्य स्वप्न होतं, गरिबी नष्ट करण्यासाठी संकल्प करणं आवश्यक असून आत्मनिर्भर आणि सक्षम गावांमुळेच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावं, प्रत्येक गावात किमान ७५ शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी, जलस्तर सुधारण्यासाठी छोट्या बांधांची निर्मित करावी असा सल्ला त्यांनी दिला.
तत्पूर्वी आज सकाळी प्रधानमंत्र्यांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन झालं. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांनी, प्रधानमंत्र्यांचं विमानतळावर स्वागत केलं. अहमदाबाद विमानतळापासून ते गांधीनगर इथल्या भाजपा मुख्यालयापर्यंत आयोजित नऊ किलोमीटरच्या रोड शो मध्ये प्रधानमंत्री सामील झाले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *