The investigation into the death of journalist Shashikant Warise will be conducted by a special investigation team
पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यूची विशेष तपास पथकामार्फत होणार चौकशी
मुंबई : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयस्पद मृत्यूची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 48 वर्षीय वारिसे यांचा गेल्या सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथं एका वाहनाखाली आल्याने अपघाती मृत्यू झाला.
वारिसे यांच्या मृत्यूची दखल प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने आपणहून घेतली असून त्याची चौकशी करण्याचे निर्देश राज्यसरकारला दिले. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास करुन सत्यता अहवाल लौकरात लौकर सादर करावा असं प्रेस कौन्सिलने सांगितलं आहे.
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल मुंबईत पत्रकारांनी मूक निदर्शनं केली. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध काळ्या फिती लावून नोंदविला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com