विधानपरिषदेत ८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रम

विधान भवन मुंबई , महाराष्ट्र Vidhan Bhavan-Mumbai-Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Special program on November 8 in the Legislative Council

विधानपरिषदेत ८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रम

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधानपरिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.Hadapsar News Vidhan Bhavan, Mumbai Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. या सभागृहाने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. माँटेग्यू- चेम्सफर्ड समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियमान्वये बॉम्बे लिजिस्लेटिव्ह कौन्सिलची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी १९२१ रोजी टाऊन हॉल, मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची सभापतिपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी १८६२ ते १९२० या कालावधीत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलचे कामकाज चालत असे. सन १९२१ मध्ये नारायण चंदावकर यांच्या रुपाने प्रथमच भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. मात्र, ‘कोविड १९’ महामारीमुळे त्यावेळी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम होईल.

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या नियोजनासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

स्नेहमेळाव्यासह ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’, ‘आमच्या आठवणीतील विधानपरिषद’ (असे सदस्य…असे प्रसंग) या विषयांवर परिसंवाद होईल. याशिवाय ‘विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये’, ‘गेल्या १०० वर्षातील महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव’, ‘लोकहिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चा’, ‘शंभर वर्षे शंभर भाषणे’ आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक, अशी पाच प्रकाशने प्रस्तावित आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष
Spread the love

One Comment on “विधानपरिषदेत ८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *