The Municipal Commissioner issued revised orders for entering the city.
If you want to come to Pune by vehicle from any other state during the lockdown period, the concerned person will now be required to bring a report issued 48 hours before entering the city, that the corona test is negative.
Municipal Commissioner Vikram Kumar has issued revised orders in that regard. According to the order, the lockdown has been extended in Pune till June 1 on the lines of the state government. The weekend lockdown will continue. In the lock-down, grocery shopkeepers are allowed to sell milk and home delivery of milk.
For the past two months, the city has been plagued by corona outbreaks. The lockdown in the city was expected to slow down as the outbreak began to subside. Also, as in other parts of the state, as in other cities, the number of patients has come down.
There was talk of the government exempting some more businesses from lock-down. However, despite the declining number of patients, health experts around the world have warned of a third wave.
Prompting the government to extend the lockdown in the state to June 1, as a precautionary measure. Therefore, the municipal corporation has upheld the decision and extended the city lock-down.
As a precautionary measure, citizens entering the city by train, bus, as well as private buses, private vehicles will no longer be required to carry a report that the corona test is negative.
शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे: महापालिका आयुक्तांचे सुधारित आदेश.
लॉक डाउन च्या काळात कोणत्याही अन्य राज्यातून वाहनाद्वारे पुणे शहरात यायचे असल्यास संबंधितांना आता 48 तास आधी कोरोना चाचणी निगेटिव असल्याचा अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. त्या बाबतचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार जरी केले आहेत.
या आदेशानुसार राज्य शासनाच्या धर्तीवर पुण्यातही एक जून पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून वीकएंड लॉक डाउन कायम असणार आहे. लॉक डाउन मध्ये किराणा दुकानदारांना दूध विक्री आणि घरपोच दूध पुरवण्याना मान्यता देण्यात आली आहे.
मागील दोन महिन्यापासून शहरात सर्वत्र कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. ही साथ ओसरण्यास सुरवात झालेली असल्याने शहरात लॉक डाऊन मध्ये शिथिलता येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच इतर शहराप्रमाणेच राज्यातील इतर भागांमध्ये मध्येही रुग्ण संख्या घटल्याने शासनाकडून काही आणखी व्यवसायिकांना लॉक डाउन मधून सूट देण्याबाबत चर्चा सुरू होती .
रुग्ण संख्या कमी होत असली तरी जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनी तिसरा लाटेचा इशारा दिल्याने शासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लोक डाऊन एक जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय कायम ठेवत शहर लॉकडाउन वाढवला आहे. मात्र त्या सोबत खबरदारीचा उपाय म्हणून यापुढे शहरात रेल्वे, बस, तसेच खासगी बस, खाजगी वाहयाद्वारे शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे