The negative impact of developments in Afghanistan on Central Asia
अफगाणिस्तानमधल्या घडामोडींचा नकारात्मक प्रभाव मध्य आशियावर
अफगाणिस्तानमधल्या घडामोडींचा नकारात्मक प्रभाव मध्य आशियावर होत आहे. या कारणास्तव भारतानं संयुक्त राष्ट संघाच्या एकात्मिक सुरक्षा करार परिषदेत इशारा दिला आहे.
संघातले भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी एस त्रीमुर्ती यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत काल हा विषय मांडला. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाली असल्याचं त्यांनी निदर्शनाला आणलं. आंतरराष्ट्रीय समुदायानं याची वेळेत दखल घेतली नाही तर, दक्षिण आशियात त्याचे विपरीत परिणाम होतील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. परिषदेचा हा २० वा वर्धापन दिवस आहे.