कोविड बाधितांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या पुण्यातही रुग्णसंख्येत घट.

The number of patients is also declining in Pune which has the highest number of covid infections.

कोविड बाधितांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या पुण्यातही रुग्णसंख्येत घट.Corona-Omicron virus.

पुणे: कोरोनाच्या नवबाधितांची दैनंदिन संख्या तसंच उपचाराधीन रुग्णसंख्या या दोन्हीमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असला, तरी केवळ पुण्याचा विचार केला, तर जिल्ह्यातली, उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या वेगानं कमी होऊ लागली आहे.

पुणेकरांसाठी ही मोठी दिलासा देणारी घटना आहे. गेल्या सात दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या 30 हजार 233 ने कमी झाले आहे.

सद्यस्थितीत पुणे शहरात साडे 14 हजारांच्या आसपास उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत. तेरा दिवसांपूर्वी म्हणजेच 24 जानेवारीला शहरातली उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या 46 हजार 302 होती. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येतली घट ही दिलासा देणारी असली, तरी पुणेकरांनी कोविड विषयक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे.

राज्यातल्या कोरोना दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट.

राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे.

राज्यात काल ६ हजार ४३६ नव्या रुग्णांची नोंद झाली.  १८ हजार ४२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत ७८ लाख १० हजार १३६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७५ लाख ५७ हजार ३४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ९८ रुग्ण दगावले. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे.  सध्या राज्यात १ लाख ६ हजार ५९ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

राज्यात कालही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *