The Opposition will adopt an aggressive stand during the Assembly’s budget session Devendra Fadnavis
आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई : महविकास आघाडी सरकार हे राज्याच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार असून आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ते आज मुंबईत, अधिवेशनापूर्वी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. या सरकारच्या चहापानाला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्याची वीज कापणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या अधिवेशनात दिलं होतं. तरीही त्यांची वीज कापली जात आहे. याविषयी सरकारला जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त ऊस आहे. अनेक ठिकाणी ऊस गाळप साठी जाणार नाही अशी परिस्थिती आहे. या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं ते म्हणाले.
नवाब मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही, हा एकप्रकारे राज्य घटनेचा अवमान आहे. देशात असं कुठंही घडलेले नाही. मलिक यांचा राजीनामा सरकारनं घेतलाच पाहिजे.