मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्र वन विभाग हडपसर मराठी बातम्या Maharashtra Forest Department Hadapsar Latest News Hadapsar News

A case has been registered for stealing the organs of a dead leopard

मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखलमहाराष्ट्र वन विभाग हडपसर मराठी बातम्या Maharashtra Forest Department Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

नवनाथ खांदवे यांच्या शेतात ८ फेब्रुवारी रोजी बिबट वन्यप्राणी मृत असल्याचे दिसून आल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मादी बिबट वय अंदाजे १० महिने ताब्यात घेतले. ९ फेब्रुवारी रोजी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची ३ नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास केला.

ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे ३ नखे व पायाचा पंजा व त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले.

आरोपी कडून ४ बिबट नखे १ पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले २ सुरे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे आणि २ बालअपचारी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वात सहा.वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा आता १३ प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार
Spread the love

One Comment on “मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *