The Prime Minister had a telephone conversation with Russian President Vladimir Putin
प्रधानमंत्र्यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत युक्रेन मधल्या परिस्थिती बाबत चर्चा केली. या वेळी पुतीन यांनी रशिया आणि
युक्रेन यांच्या प्रतिनिधींमध्ये सुरु असलेल्या वाटाघाटींविषयी मोदी यांना माहिती दिली.
सुमारे ५० मिनिटं या दोन्ही नेत्यांमधे चर्चा झाली त्यावेळी मोदी यांनी पुतीन यांच्याकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचा आग्रह धरला. तसंच, रशियाच्या सरकारनं केलेली युद्ध विरामाची घोषणा आणि सुमी शहरासह युक्रेनच्या अनेक भागांमध्ये मानवतावादी कॉरिडॉर स्थापन केल्याबद्दल त्यांचे प्रधानमंत्री मोदी यांनी कौतुक केलं.
सुमी भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढायला प्रधानमंत्र्यांनी यावेळच्या संवादात सर्वाधिक महत्त्व दिलं. या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी पोहोचवताना रशियाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही पुतीन यांनी मोदी यांच्याशी बोलताना दिली.