The Pune Covid Bulletin’ to raise awareness and counselling about Covid.
Vandana Chavan’s concept – ‘Youth Connect’ initiative.
A platform called ‘The Pune Covid Bulletin’ has been launched on Facebook by ‘Youth Connect’ (#YouthConnect) to create awareness among the citizens about Covid and bring it under control. The initiative has been initiated by the former mayor of the city and Rajya Sabha MP Vandana Chavan.
Through this platform, various information related to the Covid epidemic, the care to be taken by the citizens and the patients, the positive stories of the people of Pune who have overcome this disease, will be disseminated to the citizens. This will help in removing the atmosphere of fear and awareness among the citizens. In addition, the platform will try to provide the necessary information at that time according to the changing nature of the corona. Thanks will also be extended to the Covid warriors who have worked as ‘front line workers’ in various fields through this platform.
Doctor On Call is a feature of the Facebook page platform ‘The Pune Covid Bulletin’. Through Facebook Live, Dr Shishir Joshi will be answering various queries of the citizens regarding Covid every Saturday at 3.30 pm, resolving their doubts and giving counselling. More and more citizens should follow the page ‘Pune Covid Bulletin’ on Facebook and share it with others, appealed Vandana Chavan.
कोविडसंदर्भात जागृती व समुपदेशन करण्यासाठी ऑनलाईन ‘द पुणे कोविड बुलेटीन’ उपक्रम
खा.वंदना चव्हाण यांची संकल्पना – ‘युथ कनेक्ट’ चा पुढाकार.
नागरिकांमध्ये कोविड संदर्भात जागृती करून त्याला नियंत्रणात आणण्यासाठी ‘युथ कनेक्ट’ ( #Youth Connect ) च्यावतीने फेसबुकवर ‘द पुणे कोविड बुलेटीन’ हे व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे. शहराच्या माजी महापौर आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या व्यासपीठाच्या माध्यमातून कोविड महामारी संदर्भातील वेगवेगळी माहिती, नागरिकांनी आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी, या आजारावर खंबीरपणे मात केलेल्या पुणेकरांच्या सकारात्मक कथा यासारखी माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे. यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होण्यास आणि जागृती होण्यास मदत होणार आहे. यासोबतच कोरोनाच्या बदलत्या स्वरूपानुसार त्या-त्या वेळी आवश्यक ती माहिती देण्याचा या व्यासपीठाचा प्रयत्न राहील. तसेच या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून काम करणाऱ्या कोविड योध्यांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
Doctor On Call हा उपक्रम ‘द पुणे कोविड बुलेटीन’ या फेसबुक पेज व्यासपीठाचे वैशिष्ट्य आहे. फेसबुक live च्या माध्यमातून डॉ.शिशिर जोशी हे दर शनिवारी दुपारी ३.३० वाजता कोविड संदर्भातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन करणार आहेत, तसेच समुपदेशन करणार आहेत. त्यासाठी फेसबुकवर ‘पुणे कोविड बुलेटिन’ या पेजला अधिकाधिक नागरिकांनी फॉलो आणि इतरांसोबत शेअर करावे, असे आवाहन खा. वंदना चव्हाण यांनी केले आहे.