Organization of a voter registration camp through the Social Welfare Department for the registration of trans-gender voters
तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी समाजकल्याण विभागामार्फत मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष मतदार नोंदणी शिबिरात एकूण १०३ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तृतीयपंथी मतदार यांची मतदार नोंदणी वाढविण्याच्या अनुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी वाढवण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २४ नोव्हेंबर रोजी संगमवाडी कॉर्नर, २ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन येरवडा आणि ३ डिसेंबर रोजी ढमढरे बोळ बुधवार पेठ येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची एकूण १० पथकांनी सहभाग घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील तृतीयपंथी मतदारांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मतदार नाव नोंदणी करण्याची मोहिम राबविण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण मोहिमेला तृतीयपंथीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मतदार नोंदणी शिबिरे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वीप समन्सयक उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पुण्यातील युवक विकास आणि उपक्रम केंद्र व पुणेरी प्राईड फाऊंडेशन सिंहगड रोड पुणे या सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ डिसेंबरपर्यंत सूरू राहणार असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, पुणे सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे या कार्यालयाशी संपर्क करून जास्तीत जास्त मतदार नाव नोंदणी करावी असे आवाहन पुणे जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन”