“चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम” या विषयावर सुरक्षा संवादाचे आयोजन

Savitribai Phule Pune Universiy

A Security Dialogue on “The Rise of China and its Implications for the World”.

“चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम” या विषयावर सुरक्षा संवादाचे आयोजन

“चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम” या विषयावर तिसरा सुरक्षा संवादाचे १८ आणि १९ मार्च २०२४ रोजी आयोजन

पुणे : संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी, नवी दिल्ली आणि सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने “चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम” या विषयावर तिसरा सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला आहे. सोमवार १८ आणि मंगळवार १९ मार्च २०२४ रोजी या सुरक्षा संवादाचे उद्घाटन संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, पी. व्ही. एस. एम., यु वय एस एम, ए व्ही एस एम, एस एम व्ही एस एम; नवी दिल्ली येथील सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे अध्यक्ष, श्री जयदव रानडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे.Savitribai Phule Pune University

या विषयावर पहिला सुरक्षा संवाद ‘चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम यावर ११ आणि १२ एप्रिल, २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. याविषवरील दुसरा सुरक्षा संवाद २७ आणि २८ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता.

या वर्षी १८ आणि १९ मार्च २०२४ रोजी तिसरा सामरिक संवाद होणार आहे. “चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम” या सुरक्षा संवादाच्या आयोजयामुळे केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर या संवादातील सर्व विचारविनिमय अहवाल भारताचे माननीय पंतप्रधान, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांना सादर केले जातील.

तिसऱ्या सुरक्षा संवादातील प्रमुख वक्ते पुणे येथील सी ए एस एस चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम; भारताचे चीन, पाकिस्तान आणि भूतानमधील माजी राजदूत श्री. अँबेसेडर गौतम बंबावले, नवी दिल्ली येथील एम. पी-आय डी एस ए चे सल्लागार ग्रुप कॅप्टन अजय लेले; नवी दिल्ली येथील स्ट्रॅटन्युज ग्लोबलचे संस्थापक श्री नितीन गोखले ; कायदा आणि समाज आघाडीचे अध्यक्ष श्री. एन.सी. बिपींद्र; नॅसकॉनचे माजी अध्यक्ष डॉ.किरण कर्णिक; सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी, रिसर्च फेलो सुश्री नम्रता हसिजा; कर्नल एमबी बी नलिन हेरथ आरएसपी; सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज सहाय्यक प्राध्यापक डॉ अल्विट निंगथौजम; एअर व्हाइस मार्शल मनमोहन बहादूर व्हीएम (निवृत्त), लेफ्टनंट जनरल आर पी कलिता, पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम; (निवृत्त).माजी मुख्य पूर्व नौदल कमांडर व्हाईस-ॲडमिरल अनुप सिंग, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे हे काही प्रमुख वक्ते असतील.

या सुरक्षा संवादात विविध सत्रांसाठी प्रमुख थीम चीनच्या सामरिक धोरण, चीनच्या हायब्रिड वॉरफेअरच्या मूल्यांकनावर केंद्रित असेल; प्रादेशिक हॉटस्पॉट आणि भारत-चीन संबंध आणि पुढे वाटचाल अश्या असतील.

या सुरक्षा संवादाचे उद्घाटन सत्र सोमवार, १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह, मुख्य इमारत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपित केला जाईल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

Spread the love

One Comment on ““चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम” या विषयावर सुरक्षा संवादाचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *