भूमि अभिलेख विभागातील अर्हता धारक व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार

The scrutiny application process will be carried out for a selection of eligible holders and eligible candidates in the Land Records Department

भूमि अभिलेख विभागातील अर्हता धारक व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार

पुणे : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारक व पात्रMaha-e-Bhumi Land Records Dept उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https:///andrecordsrecruitment२०२१.in https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ९ डिसेंबर ते ३१डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली होती.

३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६ हजार ३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झाला आहे. डाटाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर सुचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

छाननी अर्ज ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज भरलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येईल. छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या सदर अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे, असे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख एन. के. सुधांशु यांनी कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *