The second-semester examination of Savitribai Phule Pune University will be in June.
Savitribai Phule Pune University will conduct the second semester of undergraduate and postgraduate examinations next month. The decision to plan for this in phases from June 15 was taken at a meeting of the university’s examination board on Saturday.
An important meeting of the university’s examination board was held on Saturday. There was a discussion on conducting the exam in the second semester. It was then agreed to conduct the examination in phases from June 15. The examination will be conducted online, and its outline will be published by the examination department. The educational schedule has collapsed on the back of the corona. Colleges and universities are also closed due to the corona outbreak. In such a situation, the first semester examinations to be held in October-November are being conducted from April. At this time the students were given exams without any technical difficulties. The University has succeeded in conducting this examination online and in a protected manner. Meanwhile, the first semester exams are nearing completion, followed by the second-semester exams. With that in view, the university has taken up the task of planning the second-semester examination. As the exams will start on June 15, it will be possible for students to study accordingly. Meanwhile, the question is whether all the courses in the second semester and online teaching have been completed.
Against this backdrop of Corona, it was decided to conduct practical examinations of various faculties of the university online. The results cannot be declared unless the marks obtained by the students in the demonstration and internal assessment are received from the college. Therefore, the college should take the practical examination till June 15. It was also decided to submit his marks to the university by June 25.
At the meeting of the Board of Examiners, it was decided to hold the examination of the second session in June. As soon as the students get the information from the college regarding the application form and payment of fees, it will be possible to take the second-semester examination. At present, it is proposed to conduct the examination in the third week of June.
द्वितीय सत्र परीक्षा जून मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर च्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढील महिन्यात होणार आहेत. दिनांक 15 जून पासून टप्प्याटप्प्याने याबाबत नियोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी झाली. त्यात दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर या परीक्षा 15 जून पासून टप्प्याटप्प्याने घेण्यावर एकमत झाले. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालय आणि विद्यापीठ बंद आहेत. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या प्रथम सत्र परिक्षा एप्रिल पासून घेण्यात येत आहेत . यावेळी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींविना परीक्षा देण्यात आली. ही परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात विद्यापीठाला यश आले आहे. दरम्यान प्रथम सत्र परीक्षा जवळपास पूर्ण होत आहेत , त्यानंतर दुसऱ्या सत्रातील परीक्षा ही लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. त्या दृष्टीने विद्यापीठाने दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले आहे . त्यानुसार या परीक्षा 15 जून पासून सुरू होणार असल्याने त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे शक्य होणार आहे . दरम्यान दुसऱ्या सत्रातील सर्व अभ्यासक्रम व ऑनलाईन पद्धतीने शिकवणे पूर्ण झाले का नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनात मिळालेले गुण महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयाकडून 15 जून पर्यंत प्रात्यक्षिक यांची परीक्षा घ्यावी. त्याचे गुण 25 जून पर्यंत व विद्यापीठाकडे सादर करावे असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
परीक्षा मंडळाच्या बैठकीत, दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जून मध्ये घेण्याचा निर्णय झाला . विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज व शुल्क भरणे, यासंबंधी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची माहिती जितक्या लवकर प्राप्त होईल तितक्या लवकर दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेणे शक्य होणार आहे सध्याचा विचार करता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ही परीक्षा घेणे प्रस्तावित आहे डॉक्टर महेश काकडे ,संचालक परीक्षा मूल्यमापन मंडळ.