The session of the State Budget Legislature will begin tomorrow, March 4 in Mumbai.
राज्य अर्थसंकल्पीय विधीमंडळाचं अधिवेशन उद्या, दिनांक ३ मार्च पासून मुंबईत सुरु होणार
मुंबई : राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार २०२२- २३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील.
अधिवेशनाची रणनिती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अन्यथा विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.