“जागर जाणिवांचा” या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार

The special program “Jagar Jaaniwancha” will be inaugurated by the Minister of School Education Varsha Gaikwad

“जागर जाणिवांचा” या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार

मुंबई :  राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार

Varsha-Gaikwad-Education Minister

असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यातला महिला दिन सप्ताह आजपासून सुरु होत असून त्या अंतर्गत “जागर जाणिवांचा” या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.
महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम यादरम्यान शाळा, जिल्हा आणि राज्य पातळीवर राबवण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. बदलत्या काळानुसार समाजातलं स्त्रियांचं स्थान, त्यांचे हक्क आणि त्यांच्या रक्षणासाठीचे कायदे अशा विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार आहेत.

तसंच मुलींना करिअर साठी मार्गदर्शन करणारी शिबिरं, मेळावे इत्यादींचं आयोजन करण्यात आलं आहे.

याखेरीज वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, अनुभव कथन, विशेष चित्रपट, लघुपटांचं प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम आहेत. महिलांनी व्यक्त होण्यासाठी समाजमाध्यमावर  #महिलादिन२०२२ #womensdaymh2022 या #hashtag  या सूत्राशी जोडून या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन शालेय शिक्षण मंत्र्यांनी केलं आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *