The state government is positive to solve the problems of playwrights and the drama movement

The state government is positive to solve the problems of playwrights and the drama movement – Deputy Chief Minister Ajit Pawar. 

Natyakshetra is the cultural glory of Maharashtra and it is necessary to lend a helping hand to Natyakshetra which is facing difficulties in the face of the Corona crisis. For this, grants from drama production organizations should be distributed immediately, directed Deputy Chief Minister Ajit Pawar today. The Deputy Chief Minister also clarified that the state government would play a positive role in resolving the issues of playwrights and theatrical movement.  Drama -logo

A meeting was organized at the Ministry under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar regarding the problems faced by the playwrights and the drama movement in the state. Speaking at the meeting, the Deputy Chief Minister said that the state government was positive to resolve the issue of drama movement. The meeting was attended by actor-playwright Prashant Damle, Dilip Jadhav and other senior officials and dignitaries in the field of drama. 

Deputy Chief Minister Ajit Pawar said that Marathi man is a playwright. Maharashtra’s drama movement is the cultural glory of the state. The state government has always strived to solve the problems of the theatre sector in the state. Demands for concessions to theatres for government theatres and rehearsals for theatrical performances, preference for theatrical performers at the Government Theaters with concessions, buses for theatres, toll exemption for tempos, bus-tempo parking and provision of space for theatres. Deputy Chief Minister Ajit Pawar instructed prizes and concessions to the winners by organizing drama competitions on experimental theatre. Actor Prashant Damle thanked Deputy Chief Minister Ajit Pawar for responding positively to the questions of the playwrights.

नाट्यनिर्माते आणि नाट्य चळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार. 

नाट्यक्षेत्र हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. यासाठी नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. नाट्यनिर्माते आणि नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. Drama -logo

राज्यातील नाट्यनिर्माते व नाट्य चळवळीसमोरील समस्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. या बैठकीस अभिनेते-नाट्य निर्माते प्रशांत दामले, दिलीप जाधव आदींसह वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

उपमख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठी माणूस नाटकवेडा आहे. महाराष्ट्राची नाट्यचळवळ राज्याचं सांस्कृतिक वैभव आहे. राज्यातील नाट्यक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील राहीलं आहे. शासकीय नाट्यगृहात नाट्यप्रयोग आणि नाटकांच्या तालमींसाठी नाट्यसंस्थांना भाडेसवलत, प्रयोगांसाठी आलेल्या नाट्यकलावंतांना शासकीय विश्रामगृहात सवलतीसह प्राधान्य, नाट्यसंस्थेच्या बसेस, टेम्पोंना टोल नाक्यांवर टोलमाफी, बस-टेम्पो पार्कींगसह नाटकाचे सेट (संच) ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करणे आदी मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांच्या स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांना बक्षीसांसह सवलती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. नाट्यनिर्मात्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनेते प्रशांत दामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *