The Union Ministry of Health has advised four states to deal with the Delta Plus variant.

The Union Ministry of Health has advised four states to deal with the Delta Plus variant.

Union Health Ministry advises Maharashtra, Kerala and Madhya Pradesh on Delta Plus Variant, currently a Variant of Concern (VOC). States are instructed to take up immediate containment measures, enhanced testing, tracking and vaccination in districts and clusters where the Delta Plus variant is found. States also instructed to send Adequate samples of positive persons to be prompt to the designated laboratories of INSACOG so that the clinical epidemiological correlations can be made.

The government of India has been proactively working towards effective COVID-19 management by the sustained strengthening of multi-level health and testing infrastructure, and through focussed Public Health Measures in active collaboration with the States. Union Health Ministry has from time to time alerted the State Governments on critical points in the trajectory of COVID-19 for implementing an effective Public Health Response under a “whole of government” approach. 

Based on the recent findings of INSACOG, the Union Health Ministry has alerted and advised Maharashtra, Kerala and Madhya Pradesh regarding the Delta Plus variant of COVID19 being found in some districts in these States. 

Union Health Secretary has communicated to these three states this variant has been found in genome sequenced samples from Ratnagiri and Jalgaon Districts of Maharashtra; Palakkad and Pathanamthitta districts of Kerala; and Bhopal and Shivpuri districts of Madhya Pradesh. 

INSACOG is a consortium of 28 laboratories of the Ministry of Health & Family Welfare, Dept. of Biotechnology, Indian Council of Medical Research (ICMR) and Council of Scientific and Industrial Research (CSIR) for whole-genome sequencing in the context of the COVID-19 pandemic.  INSACOG is tasked with not just the whole genome sequencing but also with giving timely inputs on appropriate Public Health Response measures to be adopted by States and UTs.

 

INSACOG has informed that the Delta Plus Variant, currently a Variant of Concern (VOC), has the following characteristics:

 

Increased transmissibility.

 

Stronger binding to receptors of lung cells.

 

Potential reduction in monoclonal antibody response.

 

 

The Union Health Ministry has advised Maharashtra, Kerala and Madhya Pradesh that the Public Health Response measures, while broadly remaining the same as have been implemented by them earlier, have to become more focused and effective.  The States Chief Secretaries have been advised to take up immediate containment measures in the districts and clusters (as identified by INSACOG) including preventing crowds & intermingling of people, widespread testing, prompt tracing as well as vaccine coverage on a priority basis.

 

They were also advised to ensure that adequate samples of positive persons are promptly sent to the designated laboratories of INSACOG so that clinical epidemiological correlations can be made for further guidance to be provided to States. 

डेल्टा प्लस व्हेरीयंट या चिंतेच्या विषाणू स्वरूपाच्या हाताळणीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चार राज्यांना दिला सल्ला. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना डेल्टा प्लस व्हेरीयंट, या सध्याच्या चिंतेच्या विषाणू स्वरूपाच्या हाताळणीबाबत दिला सल्ला.  कोविड-19 च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार सातत्याने बहुस्तरीय आरोग्य यंत्रणा आणि चाचणीच्या पायाभूत सुविधा अधिकाधिक बळकट करत आहे. आणि राज्यांशी समन्वय साधून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उपाययोजनांवर भर देत आहे. कोविड-19 च्या आजवरच्या प्रवासातील महत्वाच्या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी राज्य सरकारांना आवश्यक त्या सूचना देत, संकटांचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविड-19 च्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीयंट म्हणजे प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत, केरळच्या पलक्कड आणि पाठ्नामथित्ता जिल्ह्यांत तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात हा व्हेरीयंट आढळला आहे.

 

इन्साकॉग ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिंतेचा विषय ठरलेल्या या विषाणूच्या स्वरुपाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :-

 

संक्रमणक्षमतेत वाढ.

 

फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता.

 

मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना सल्ला दिला आहे की या व्हेरीयंटचा सामना करतांना सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना आधीप्रमाणेच अमलात आणायच्या असल्या तरीही, त्या अधिक प्रभावीपणे आणि या व्हेरीयंटच्या रुग्णांकडे बारकाईने लक्ष देत अमलात आणल्या जाव्यात. इंसाकॉग ने निश्चित केलेले या विषाणूच्या संसर्गाचे समूह आणि जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राविषयीच्या उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जाव्यात असे निर्देश, राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. यात गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी संचारावर निर्बंध, चाचण्यांची संख्या वाढवणे, संशयित रुग्णांचा माग अशा उपायांचा समावेश आहे. तसेच या भागात लसीकरणाला वेग देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

 

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या स्वाबचे नमुने ताबडतोब इंसाकॉगच्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जावे जेणेकरुन त्यांचे क्लिनिकल परीक्षण लगेच केले जाऊन, राज्यांना त्याविषयी माहिती दिली जाऊ शकेल, अशीही सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *