The vaccination campaign for Pune Municipal Corporation employees and their relatives.
The vaccination campaign for Pune Municipal Corporation employees and their relatives was started on 31/05/2021. This includes vaccination of front-line workers working under the solid waste management department, their relatives, contract cleaners cleaning the main building of the corporation, mechanical sweepers at various places in the city, employees working at various waste processing projects under solid waste management. A total of 140 employees were vaccinated on 31/05/2021.
Also on 01/06/2021, the remaining employees will be vaccinated and a total of 250 employees will be vaccinated. On this occasion, Hon. Standing Committee Chairman Hemant Rasne, Mrs. Varsha Tapkir, Mrs. Mansi Deshpande, Hon. Municipal Commissioner Shri. Vikram Kumar, Ma. Extreme. Municipal Commissioner (h) Mrs. Rubal Agarwal, Hon. Deputy Commissioner Solid Waste Management Ajit Deshmukh, Hon. Municipal Assistant Commissioner Shri Yunus Pathan, Doctors, Nurses, Citizens were present.
पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांचे लसीकरण करण्याची मोहीम.
पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांचे लसीकरण करण्याची मोहीम दिनांक ३१/०५/२०२१ पासून सुरु करण्यात आली. या मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागा अंतर्गत कार्यरत फ्रंट लाईन वर्कर्स, त्यांचे नातेवाईक, मनपा मुख्य इमारतीची स्वच्छता करणारे कंत्राटी सफाई सेवक, शहरात विविध ठिकाणी मेकेनीकल स्वीपिंग करणारे कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या ठिकाणी कार्यरत असणारे कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात येत आहे. दिनांक ३१/०५/२०२१ रोजी एकूण १४० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.
तसेच दिनांक ०१/०६/२०२१ रोजी उर्वरीत कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु असून एकूण २५० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या प्रसंगी मा.स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, श्रीमती वर्षा तापकीर, श्रीमती मानसी देशपांडे, मा. महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार , मा. अति. महापालिका आयुक्त (ज) श्रीमती रुबल अग्रवाल , मा. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन अजित देशमुख , मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री युनुस पठाण , डॉक्टर्स, नर्सेस, नागरिक उपस्थित होते.