The vaccine will be available tomorrow, June 7, 2021.
The municipality had received a large supply of vaccines last week. Therefore, regular vaccinations are started at all vaccination centers in the city. During this period, the second dose was given to citizens above 45 years of age and 20% of the vaccine was used for the first dose. But vaccination was stopped on Sunday due to non-availability of vaccine on Saturday. But now that the vaccine is available, covid-19 vaccinations will be given to citizens eighteen years of age on June 7 tomorrow.
In order to prevent the spread of Coronavirus in the city of Pune, arrangements have been made to provide Covsin vaccine to the citizens of the city at various government hospitals within the limits of the Pune Municipal Corporation. Citizens above 18 years of age who have taken the first dose on or before May 10, 2019, will be given the second dose on Monday, June 7. Out of the available stock of vaccines, 60% of the vaccine will be given to the citizens who have made an appointment by booking online and 40% of the vaccine (on the spot) will be registered and given a second dose. Online booking will start tomorrow, Monday, June 7 at 8 am.
Also, the first dose of Covidshield available stock will be given to citizens aged 45 and over, who have completed 84 days (before 15 March 2021). Also, 60 percent of the vaccine will be given first to the citizens aged 45 years and above who have made an appointment by booking online. Online booking will start at 8 am on Monday. The rest of the vaccine (including the Disability Citizen Certificate) will be given first by breastfeeding mothers, healthcare workers, front-line workers, and citizens above 45 years of age by pre-registering at the immunization center. Employees have been instructed to register on the spot if there is any vaccine left in the vaccine cup opened before the end of the session so that the vaccine is not wasted.
उद्या दिनांक ७ जून २०२१ रोजी लस उपलब्ध .
मागील आठवड्यात महापालिकेस लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला होता. त्यामुळे शहरातील लसीकरण सर्व केंद्रावर नियमित लसीकरण सुरु होते. या कालावधीत ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस दिला जात होता, तसेच २०% लस ही पहिला डोस देण्यासाठी वापरली जात होती. पण शनिवारी लस उपलब्ध न झाल्यामुळे रविवारी लसीकरण बंद होते. पण आता लस उपलब्ध झाल्यामुळे, उद्या दिनांक सात जून रोजी आठरा वर्षा पुढील नागरिकांना covid-19 लसीकरण होणार आहे.
पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी, शहरातील नागरिकांना, कॉव्हसिन लस पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध सरकारी रुग्णालय देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 18 वर्षावरील वर्षावरील नागरिकांना दिनांक 10 मे 2019 व त्यापूर्वी पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना उद्या सोमवार दिनांक सात जून रोजी प्राध्यानाने दुसरा डोस देण्यात येणार आहे . लसीच्या उपलब्ध साठया पैकी ६०% लस ही ऑनलाईन बुकींग करून अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना व 40 टक्के लस (ऑन द स्पॉट )नोंदणी करून दुसरा डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग उद्या सोमवार दिनांक सात जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.
तसेच कोविडशील्डच्या उपलब्ध साठ्या पैकी प्रथम प्राध्यानाने दुसरा डोस हा 45 व अधिक वर्ष असलेल्या नागरिकांना, ज्यांनी (15 मार्च 2021 पूर्वी) 84 दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच 60 टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉइंटमेंट घेतलेल्या 45 व अधिक वर्षे वय असलेल्या नागरिकांना पहिला देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग उद्या सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. उर्वरित लस ही (दिव्यांग नागरिक प्रमाणपत्र सहित) स्तनदा माता, हेल्थकेअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व वय वर्ष ४५ पेक्षा अधिक असलेल्या नागरिक यापैकी उपस्थित राहिलेल्या ना लसीकरण केंद्रावर प्राधान्याने नोंदणी करून पहिला डोस देण्यात येइल. सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ऑन द स्पॉट नोंदणी करून देण्यात यावी देण्यात यावी जेणेकरून लस वाया जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.