आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला सात दिवसांची मुदत

Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The Vanchit Bahujan Aghadi has given the Congress seven days to form a coalition

आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला सात दिवसांची मुदत

काँग्रेसकडून उत्तर न मिळाल्यास राज्यात लोकसभेच्या ४८ जागांवर उमेदवार उभे करु असा इशारा

मुंबई : वंचित बहूजन आघाडीने काँग्रेस पक्षाला आपल्यासोबत आघाडी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत काँग्रेसकडून उत्तर न मिळाल्यास राज्यात लोकसभेच्या ४८ जागांवर उमेदवार उभे करु असा इशारा, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आंबेडकर यांनी यासंदर्भात आज पत्रक प्रसिद्धीला दिलं. प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणं हे काँग्रेसचं कर्तव्य असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

वंचितचे प्रवक्ते अ‍ॅड. प्रियदर्शी तेलंग यांनी १ सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबत पत्र पाठवले होते. परंतु काँग्रेसकडून अद्याप यावर कुठलेही ठोस उत्तर आलेले नाही. त्यामुळे संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ७ दिवसांची मुदत दिली आहे, अशी माहिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वंचित बहुजन आघाडीला हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का. मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६.९८ आणि ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. २०१९ पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे तो पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे.

जर INDIA आघाडी भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. परत एकदा सांगतो, आमचे दरवाजे खुले आहेत” असे तेलंग यांनी लिहिलेल्या ई-मेलच्या समारोपाच्या परिच्छेदात म्हटले होते असे वंचित आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
भारतातील पहिली हरित हायड्रोजन इंधन सेल बस सुरू
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *