There is no significant increase in corona pediatric patients.

In Maharashtra, there is no significant increase in corona pediatric patients.

An analysis of the number of corona cases found in Maharashtra in the last six months did not show much change in the incidence of corona infection in young children, the health department said. The incidence of coronary heart disease in children under the age of 18 is about 0.07 percent in May 2021, indicating a lower incidence of the disease in children.

National-level consultants have predicted that children will be infected in the third wave. Therefore, the state government has set up a task force of state-level pediatricians. At the same time, the state government is making necessary preparations to set up infrastructure at the hospital level for the treatment of children. Pradip Vyas said.

The proportion of children infected with a corona in total corona infections is as follows:  Public Health Division, Maharashtra

Between November 2020 and April 2021, the age group is the same – 1.3 percent for zero to five, 2.4 percent for six to eleven years, 4.1 percent for twelve to seventeen, a total of 7.8 percent.
November 2020 (age group zero to five years 1.3 percent, six to eleven years 2.1 percent, twelve to seventeen years 3.5 percent, total 6.9 percent)
December 2020 (age group zero to five years 1.1 percent, six to eleven years 1.9 percent, twelve to seventeen years 3.3 percent, total 6.3 percent)
January 2021 (age group zero to five years 1.1 percent, six to eleven years 1.7 percent, twelve to seventeen years 3.2 percent, total 6.0 percent)
February 2021 (zero to five years 1.18 percent, six to eleven years 2.00 percent, twelve to seventeen years 4.08 percent, total 7.26 percent)
March 2021 (zero to five years 1.10 percent, six to eleven years 2.04 percent, twelve to seventeen years 3.64 percent, total 6.78 percent)
April 2021 (age group zero to five years 1.42 percent, six to eleven years 2.62 percent, twelve to seventeen years 4.34 percent, total 8.38 percent) shows that the number of children infected with corona has increased in the last six years. That’s about the same month.

The situation is similar in the Ahmednagar district. In March 2021 (there were 188 patients in the age group of zero to five years, it was 1.01 percent of the total patients, 270 patients in the age group of six to ten years, the total proportion was 1.45 percent, 1173 patients in the age group of eleven to eighteen years, the total proportion was 6.28 1631 patients in the age group of zero to 18 years, the total proportion is 8.74 percent, the total number of patients in Corona is 18 thousand 669)

In April 2021 (757 patients in the age group of zero to five years, 0.98 percent of the total patients, 1510 patients in the age group of six to ten years, 1.95 percent in total, 5340 patients in the age group of eleven to eighteen years, 6.90 percent in total, zero In the age group of 18 years, the total proportion of 7607 patients is 9.83 percent;

In May 2021 (1,076 patients in the age group of zero to five years, 1.33 percent of the total patients, 1,918 patients in the age group of six to ten years, 2.37 percent in the total, 6422 patients in the age group of eleven to eighteen, 7.95 percent in the total, zero to The total proportion of 9416 patients in the age group of 18 years is 11.65 percent, the total number of corona patients is 80 thousand 785)

This shows that the rate of infection is generally the same in children under 18 years of age. The increase in the total number of corona patients has led to an increase in pediatric infections.

महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही – आरोग्य विभागाचा खुलासा. 

महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालय स्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

एकूण कोरोनाबाधीतांमध्ये कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण खालील प्रमाणे आहे:

  • नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या दरम्यान वयोगटानुसार बाधीतांचे प्रमाणे असे आहे – शून्य ते पाच १.३ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.४ टक्के, बारा ते सतरा ४.१ टक्के, एकूण ७.८ टक्के.
  • नोव्हेंबर २०२० (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.३ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.१ टक्के, बारा ते सतरा वर्षे ३.५ टक्के, एकूण ६.९ टक्के)  Public Health Division, Maharashtra
  • डिसेंबर २०२० (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.१ टक्के, सहा ते अकरा वर्षे १.९ टक्के , बारा ते सतरा वर्षे ३.३ टक्के, एकूण ६.३ टक्के)
  • जानेवारी २०२१ (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.१ टक्के, सहा ते अकरा वर्षे १.७ टक्के, बारा ते सतरा वर्षे ३.२ टक्के, एकूण ६.० टक्के)
  • फेब्रुवारी २०२१ (शून्य ते पाच वर्षे १.१८ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.०० टक्के, बारा ते सतरा वर्षे ४.०८ टक्के, एकूण ७.२६ टक्के)
  • मार्च २०२१ (शून्य ते पाच वर्षे १.१० टक्के, सहा ते अकरा वर्षे २.०४ टक्के, बारा ते सतरा वर्षे ३.६४ टक्के, एकूण ६.७८ टक्के)

एप्रिल २०२१ (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.४२ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.६२ टक्के, बारा ते सतरा वर्षे ४.३४ टक्के, एकूण ८.३८ टक्के) या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की कोरोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात जवळपास तेवढेच राहिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती काहीशी अशीच आहे. मार्च २०२१ मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात १८८ रुग्ण होते, ते एकूण रुग्णांच्या १.०१ टक्के होते, सहा ते दहा वर्षे वयोगटातील २७० रुग्ण, एकूण प्रमाण १.४५ टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ११७३ रुग्ण, एकूणात प्रमाण ६.२८ टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात १६३१ रुग्ण एकूणात प्रमाण ८.७४ टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण १८ हजार ६६९)

एप्रिल २०२१ मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात ७५७ रुग्ण, एकूण रुग्णांच्या ०.९८ टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात १५१० रुग्ण, एकूणात प्रमाण १.९५ टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ५३४० रुग्ण, एकूणात प्रमाण ६.९० टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात ७६०७ रुग्ण एकूणात प्रमाण ९.८३ टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण ७७ हजार ३४४)

मे २०२१ मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात १०७६ रुग्ण एकूण रुग्णांच्या १.३३ टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात १९१८ रुग्ण, एकूणात प्रमाण २.३७ टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ६४२२ रुग्ण, एकूणात प्रमाण ७.९५ टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात ९४१६ रुग्ण एकूणात प्रमाण ११.६५ टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण ८० हजार ७८५)

यावरून हे दिसून येते की १८ वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आली आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *