Changes in traffic in Indapur city
इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल
विधान चौक ते स्मशानभुमी चौक १०० फुटी रस्त्यावरील वाहतूक ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरती बंद
पुणे : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत शहरातील संविधान चौक ते स्मशानभुमी चौक १०० फुटी रस्त्यावरील वाहतूक ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरती बंद करुन बाबा चौक ते खुळे चौक ते राजेवलीनगर या मार्गे वळविण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल”