Training of 1400 drivers through the Motor Vehicle Department of Pune Municipal Corporation
पुणे महानगरपालिका मोटार वाहन विभागा मार्फत १४०० वाहन चालकांना प्रशिक्षण
पुणे : मा.श्री.विक्रम कुमार, महापालिका आयुक्त आणि मा.श्री.कुणाल खेमनार अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली आज दिनांक २० आगस्ट २०२३ रोजी पुणे महानगरपालिका मोटार वाहन विभाग मार्फत १४०० वाहन चालकांना गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी ४ विषयावर तज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
१.रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियम ( Road safety and Traffic Rules ) : श्री. अनिल पंतोजी , सेवा निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
२.शिस्त व वर्तणुक व्यवस्थापन (Discipline and Behavioral Management): श्री.राजीव नंदकर, उप आयुक्त.
३.वाईट सवयी कमी करणे आणि कार्यक्षमता सुधारणे (How To Break Bad Habits and Improve the Performance ): श्री.अमीर देसाई , मुक्तांगण केंद्र पुणे
४.तणाव आणि आरोग्य व्यवस्थापन (Stress and Health Management): श्री.अशोक देशमुख, प्रसिद्ध व्याख्याते
या प्रशिक्षण साठी मा. संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांची उपस्थिती होती.
या वेळी वाहन चालक यांची आरोग्य विभाग मार्फत रक्तदाब,दंत, शुगर आणि डोळे तपासणी करण्यात आली.तसेच प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी श्री.अशोक देशमुख, प्रसिद्ध व्याख्याते यांच्या हसत खेळत तणाव मुक्ती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी श्री.ऋषिकेश चव्हाण , वाहतूक व्यवस्थापक, श्री. हितेंद्र कुरणे, कार्यकारी अभियंता, श्री. गणेश उगले कार्यकारी अभियंता, श्री.प्रमोद पागगुडे, वाहतूक निरीक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. श्री.राजेंद्र शिपेकर,उप अभियंता यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री.ऋषिकेश चव्हाण यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पुणे महानगरपालिका मोटार वाहन विभागा मार्फत १४०० वाहन चालकांना प्रशिक्षण”