Governor Ramesh Bais flagged off the Tri-Services Veterans Day Parade
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘ट्राय सर्व्हिसेस व्हेटरन्स डे’ चा शुभारंभ
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी नरिमन पॉइंट येथे निळा झेंडा दाखवून ‘ट्राय सर्व्हिसेस व्हेटरन्स वेटरन्स डे’ चा शुभारंभ केला. त्यानंतर रोड शो करण्यात आला, त्यामध्येही राज्यपाल सहभागी झाले. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणांनी हा परिसर दुमदुमला.
लष्कर, नौदल व वायुदल या तीनही सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय कार्याची आठवण करून देऊन, या शूरवीरांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी ‘ट्राय सर्व्हिसेस व्हेटरन्स डे’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवगळ्या दिवशी साजरा केला जातो.
नेव्ही फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल विजय वढेरा,सचिव कर्नल राज दत्ता, अर्जुन पुरस्कार प्राप्त लेफ्टनंट कर्नल फारोख तारापोर, लेफ्टनंट कर्नल गोपाल सिंग (वय वर्ष 93), नेव्ही फाउंडेशनचे माजी अध्यक्ष कॅप्टन राज मोहिंद्र- (वय 90 वर्षे), कारगिल युद्धानंतर ऑपरेशन मध्ये दोन्ही पाय गमवलेले नाईक दीपचंद यासह लष्कर, नौदल व वायुदल या तीनही दलातील आजी आणि माजी अधिकारी यांचे कुटुंबीयदेखील यावेळी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘ट्राय सर्व्हिसेस व्हेटरन्स डे’ चा शुभारंभ”