Union Finance Minister instructs banks to adopt more consumer-friendly practices
अधिकाधिक ग्राहक स्नेही कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची बँकांना सूचना
पायाभूत क्षेत्रांमधली गुंतवणूक बऱ्याच काळपर्यंत फायदा देणारी असते, त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर अर्थसंकल्पात भर दिला, असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. स्टार्ट अप कंपन्यांना कर्ज घेण्यासाठी कुठलीही हमी देण्याची गरज नाही हे प्रधानमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
अर्थसंकल्पानंतरच्या एका बैठकीत, बँकिंग प्रतिनिधी, कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रमुख, उद्योग आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, स्टार्ट अप क्षेत्रातील यशस्वी उद्योजक यांच्याशी अर्थमंत्र्यांनी संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात विविध हितसंबंधी गट, उद्योग प्रतिनिधि, बँकर्स, नियमन आणि वित्तीय बाजारपेठेत कार्यरत असणाऱ्यांशी अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत.