पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

United Efforts for the Development of Pune – Deputy Chief Minister Ajit Pawar

पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होणारी विकासकामे इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या आणि शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या आहेत. पुण्याच्याPM Narendra Modi-Dy-CM-Ajit Pawar विकासासाठी  एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ते म्हणाले, पुणे ही रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांची भूमी आहे.  जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर चालवून पुण्याच्या पुनर्निर्माणाचा शुभारंभ केला होता. राष्ट्रनिर्मितीचा आणि जनसेवेचा हा वारसा पुढे नेण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे.

 पुणे मेट्रोसाठी जनतेला धन्यवाद

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पुण्याच्या जनतेने अडचणी सहन केल्या आहेत. १२ किलोमीटर मार्गावर ही मेट्रो रेल्वे धावणार आहे.  पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट विस्तारीकरणाबरोबरच पिंपरी-चिंचवड ते निगडी कॅरीडोर, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोड मार्गिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा काम चालू आहे. या प्रकल्पांसाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर टप्पा २ च्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकासासाठी पर्यावरणाचा विचार करावा लागेल

मुळा-मुठा नदी सुशोभिकरण आणि जायका प्रकल्प शहरासाठी महत्वाचे आहेत. पुण्यात साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर मुळा-मुठा नदी सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि  जैवविविधतेला धक्का न लावता ही कामे करावी लागतील. पूर नियंत्रण रेषेचा विचारही होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येईल.

इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी करण्याचा विचार व्हावा

शासनाने पर्यावरण रक्षणासाठी ई-वाहन धोरण स्विकारले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण रक्षणाला मदत होईल. सायकलचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वाहनांच्या किंमती कमी करण्याबाबत विचार व्हावा, असे मतही श्री.पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री. फडणवीस यांनी देखील विचार व्यक्त केले. श्री.मोहोळ यांनी स्वागतपर भाषणात पुणे शहरातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती देऊन प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे स्वागत केले. उषा लक्ष्मण यांनी आर.के.लक्ष्मण यांची पुस्तके प्रधानमंत्री श्री.मोदी यांना भेट दिली.

पुण्यातील वाहतूक गतिमान करणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या १२ किमी मार्गिकेचे उदघाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किलोमीटर मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी गरवारे मेट्रो स्थानक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री  सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत संयुक्तपणे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी होत असून पहिल्या टप्यात पुणे येथील गरवारे ते वनाज आणि पिंपरी चिंचवड येथील पीसीएमसी ते फुगेवाडी असा एकूण १२ किलोमीटर मार्ग सुरू करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके आहेत.

विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी,  १४० ई-बस आणि बाणेर येथील ई-बस डेपोचेही लोकार्पण आणि  मुळा-मुठा नदी  पुनरुज्जीवन आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मुळा-मुठा नदीच्या ९ किलोमीटरच्या पट्ट्यात नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.  यामध्ये नदीकाठचे  संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे  प्रदूषण कमी करणाऱ्या प्रकल्पांतर्गत एकूण ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४०० एमएलडी असेल.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *