Use the knowledge gained during the training period for government and society.

Use the knowledge gained during the training period for government and society – Transport Minister Adv. Anil Parab.

 A training institute is a place of rites.  Transport Minister Adv Anil Parab hoped to use the knowledge gained during the training period to work for the government and society as a social responsibility.

Transport Minister Ad Anil Parab expressed his views on the guidance of a team of newly appointed trainee assistant vehicle motor inspectors at a workshop in Dapodi today. State Transport Corporation Vice President and Managing Director Shekhar Channe, Additional Commissioner of Police N.D. Chavan, Regional Transport Officer Ajit Shinde, Sub-Regional Transport Officer Sanjay Sasane, Workshop Manager Mr Khairmode along with officers, staff and trainees were present. Anil Parab

        Transport Minister Ad Parab said that the knowledge gained during the training should be used to curb illegal traffic in the future. Keep yourself updated with the changing technology of modern times. Calling for the use of knowledge for government services and citizens, transport services are the lifeline of the poor. He also wished the trainees all the best for the future.

State Transport Corporation Vice President and Managing Director Shekhar Channe said, “It is our responsibility to adopt the latest technology in the years to come. We have to strive to provide better service to the citizens by doing quality work with the help of changing technology. This will help in raising more image in the minds of the citizens. Today, 87 services have been made available online for the citizens through the Department of Transport. Regional Transport Officer Ajit Shinde introduced the program while trainee Suvarna Chavan thanked the participants. 

प्रशिक्षण कालावधीत घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग शासन व समाजासाठी करा-परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

 प्रशिक्षण संस्था ही संस्कार करण्याची जागा असते.  प्रशिक्षण कालावधीत घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शासन व समाजासाठी काम करण्याची अपेक्षा परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी व्यक्त केली. 

परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी आज दापोडी येथील कार्यशाळेत नवनियुक्त प्रशिक्षणार्थी सहायक वाहन मोटार निरीक्षकाच्या तुकडीस मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस आयुक्त एन.डी. चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, कार्यशाळा व्यवस्थापक श्री.खैरमोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थीं उपस्थित होते.  Anil Parab

 परिवहनमंत्री ॲड परब म्हणाले, प्रशिक्षण काळात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग येत्या काळात अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी करा. आधुनिक काळात बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्व:तला अद्यावत ठेवा.  ज्ञानाचा उपयोग शासन सेवा व नागरिकांसाठी करण्याचे आवाहन करत परिवहन सेवा ही गरिबाची जीवनवाहिनी आहे. तसेच त्यांनी प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले, येत्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची आपली जबाबदारी आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणवत्तापूर्ण काम करुन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल. त्यामुळे नागरिकांच्या मनात आणखी प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. परिवहन विभागामार्फत नागरिकांसाठी आज अखेर 87 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले तर  प्रशिक्षाणार्थी सुवर्णा चव्हाण यांनी आभार मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *