प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन.

the legendary tabla maestro, Ustad Zakir Hussain Ji

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन

तबल्याचा ताल हरपला!  झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथे निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसैन यांना ५ ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. तसंच, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातल्या नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.the legendary tabla maestro, Ustad Zakir Hussain

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या आपल्या शोकभावना

उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनामुळे संगीतविश्वाची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांना लाभलेली सर्जनशीलता आणि कल्पकता विलक्षण होती. झाकीर हुसैन भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताला जोडणारा पूल होते. त्यांना पद्मविभूषण बहाल करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला तीव्र शोक

उस्ताद झाकीर हुसैन हे भारतीय शास्त्रीय संगीतविश्वात क्रांती घडवणारा खरा प्रतिभावंत म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या प्रतिभेने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलंच पण तबल्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धीही मिळवून दिली, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादनशैल आणि अंगभूत प्रतिभा यांमुळे उस्ताद झाकीर हुसैन यांनी आपल्या तबलावादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं, अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे.

उस्ताद झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीतातील जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे.

उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले. प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अशा दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबलावादनाने मंत्रमुग्ध केले. त्याचे तबलावादन ऐकून लाखो युवक युवती तबलावादनाकडे वळले.

भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवून एकल तबलावादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साथ संगीतकार म्हणून आपला अमीट ठसा उमटवताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक संगीतकारांसोबत तबलावादन केले.

त्यांच्या निधनामुळे भारताने-विशेषतः महाराष्ट्राने आपला अत्यंत लाडका सुपुत्र व संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा गमावला आहे. झाकीर हुसेन यांचे संगीत चिरंतन राहील व संगीतकारांच्या पिढ्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरित करील. या दुःखद प्रसंगी मी दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय व लाखो संगीत चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

तबल्याचा ताल हरपला! झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबला क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील.

वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरुवात करणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबलावादनाला अत्युच्च अशा शिखरावर नेले. गाणारा तबला ही त्यांच्या जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे.

ज्येष्ठ कलाकारांबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती. तरूण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसेन होते. साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

कलाविश्वाचा ताल चुकला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली

भारतीय अभिजात संगीताचा समृद्ध खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते.

उस्ताद अल्लारखाँ साहेबांसारखा पिता आणि गुरु त्यांना घरातच लाभला. कुरेशी घराणे हे तालविश्वातील एखाद्या नक्षत्रासारखे अढळ होते. अतिशय साधी राहाणी, आणि कुठलाही कर्मठपणा व्यक्तिमत्त्वात नसलेले उस्तादजी रसिकांना क्षणार्धात आपलेसे करत. भजनी ठेक्यापासून तबल्याचे अवघड कायदे आणि अनवट ताल त्यांच्या बोटात जणू वस्तीला होते. दिग्गज गायक-वादकांना संगत तर ते करत होतेच, पण तीन-तीन तास तबल्याची सोलो मैफल रंगवणारे बहुदा ते पहिलेच उस्ताद असतील. तबलावादनाला सरस्वतीचे पूजन मानणारा हा कुणी देवदूतच पृथ्वीवर येऊन गेला, असे आता म्हणावे लागेल.

सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण

झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले. हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.

त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.

हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले

झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.

हुसेन यांना 1990 मध्ये भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि 2018 मध्ये रत्ना सदस्याने सन्मानित करण्यात आले. 1999 मध्ये त्यांना युनायटेड स्टेट्स नॅशनल एन्डोवमेंट फॉर द आर्ट्स नॅशनल हेरिटेज फेलोशिप, हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. पारंपारिक कलाकार आणि संगीतकारांना. हुसेनला सात ग्रॅमी पुरस्कार नामांकन मिळाले आहेत, ज्यात चार विजयांचा समावेश आहे, ज्यात 2024 मध्ये तीन आहेत

हुसैन जॉर्ज हॅरिसनच्या 1973 च्या अल्बम लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड आणि जॉन हँडीच्या 1973 अल्बम हार्ड वर्कमध्ये वादन केले . त्यानी व्हॅन मॉरिसनच्या 1979 मधील अल्बम इंटू द म्युझिक अँड अर्थ, विंड अँड फायरच्या 1983 अल्बम पॉवरलाइटवरही सादरीकरण केले.

मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड, जे हुसेन यांना १९६० च्या दशकापासून ओळखत होते , त्यांनी त्यांना प्लॅनेट ड्रम हा विशेष अल्बम तयार करण्यासाठी आमंत्रित केले, ज्यामध्ये जगाच्या विविध भागांतील तबला वादक होते.

रायकोडिस्क लेबलवर 1991 मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या प्लॅनेट ड्रम अल्बमने 1992 चा सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळवला, जो या श्रेणीतील पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे. ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट अल्बम आणि टूरने प्लॅनेट ड्रम अल्बमच्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या पुनर्मिलनमध्ये मिकी हार्ट, हुसेन, सिकिरू अडेपोजू आणि जियोव्हानी हिडाल्गो यांना पुन्हा एकत्र आणले. 8 फेब्रुवारी 2009 रोजी झालेल्या 51 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट या अल्बमने सर्वोत्कृष्ट समकालीन जागतिक संगीत अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला.

हुसेन यांनी मल्याळम चित्रपट वानप्रस्थम, 1999 मध्ये AFI लॉस एंजेलिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (AFI फेस्ट) मध्ये ग्रँड ज्युरी पारितोषिकासाठी नामांकित केलेल्या 1999 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हल प्रवेशासाठी भारतीय संगीत सल्लागार म्हणून संगीत, सादरीकरण आणि अभिनय केला आणि 2000 मध्ये पुरस्कार जिंकले.

इस्तंबूल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (तुर्की), 2000 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (भारत), आणि 2000 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (भारत). त्यांनी अनेक चित्रपटांसाठी साउंडट्रॅक तयार केले आहेत, विशेषत: इस्माईल मर्चंटच्या इन कस्टडी आणि द मिस्टिक मासूर, आणि फ्रान्सिस कोपोलाच्या एपोकॅलिप्स नाऊ, बर्नार्डो बर्टोलुचीच्या लिटल बुद्धा आणि इतर चित्रपटांच्या साउंडट्रॅकवर तबला वाजवला. विशेषत: एकल आणि विविध बँडसह त्याचे संगीत प्रदर्शन प्रदर्शित करणारे चित्रपट 1998 डॉक्युमेंटरी झाकीर अँड हिज फ्रेंड्स आणि डॉक्युमेंट्री द स्पिकिंग हँड: झाकीर हुसेन आणि द आर्ट ऑफ द इंडियन ड्रम (2003 सुमंत्र घोषाल). हुसैन यांनी 1983 च्या मर्चंट आयव्हरी फिल्म हीट अँड डस्टमध्ये इंदर लालच्या भूमिकेत सह-कलाकार केला, ज्यासाठी ते सहयोगी संगीत दिग्दर्शक होते.

हुसेन हे बिल लासवेलच्या जागतिक संगीत सुपरग्रुप तबला बीट सायन्सचे संस्थापक सदस्य होते.  2016 मध्ये, व्हाईट हाऊस येथे आंतरराष्ट्रीय जॅझ डे 2016 ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी अध्यक्ष ओबामा यांनी आमंत्रित केलेल्या अनेक संगीतकारांमध्ये हुसैन होते.

लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांच्याशी झालेल्या संभाषणात, त्यांच्या झाकीर हुसेन: ए लाइफ इन म्युझिक या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, हुसेन यांनी सांगितले की ते खाजगी संमेलने, कॉर्पोरेट कार्यक्रम किंवा विवाहसोहळ्यांमध्ये तबला वाजवत नाही; त्यांचा असा विश्वास होता की ज्या कार्यक्रमांमध्ये लोक एकत्र येण्यासाठी येतात, मद्यपान करतात किंवा जेवणाचा आनंद घेतात अशा कार्यक्रमांमध्ये संगीत ऐकले जाऊ नये (संगीत हा कार्यक्रमाचा एकमेव उद्देश असावा).

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

विकसित भारताची संकल्पना हे एक लक्ष्य नसून ते पवित्र अभियान

Spread the love

One Comment on “प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *