पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

nauguration of Veer Savarkar International Airport terminal at Port Blair by Prime Minister पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Inauguration of Veer Savarkar International Airport terminal at Port Blair by Prime Minister

पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

पोर्ट ब्लेअरच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे प्रवास सुलभता, व्यवसाय सुलभता आणि संपर्क व्यवस्था वाढेल”

“अंदमान हे विकास आणि वारशाच्या महामंत्राचे बनत आहे जिवंत उदाहरण”nauguration of Veer Savarkar International Airport terminal at Port Blair by Prime Minister
पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन केले. नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 710 कोटी रुपये खर्च आला असून, दरवर्षी सुमारे 50 लाख प्रवासी वाहतुकीची याची क्षमता आहे.

आजचा कार्यक्रम पोर्ट ब्लेअरमध्ये होत असला तरी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी वाहतुक क्षमता वाढवण्याची मागणी पूर्ण होत असल्याने संपूर्ण देश या केंद्रशासित प्रदेशाकडे उत्सुकतेने पाहत आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. येथील आनंदी वातावरण आणि नागरिकांचे आनंदी चेहरे अनुभवता यावेत यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता यायला हवे होते अशी इच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. “अंदमानला भेट देण्याची इच्छा असणाऱ्यांनीही मोठ्या क्षमतेच्या विमानतळाची मागणी केली होती”, असे ते पुढे म्हणाले.

सध्याच्या टर्मिनलमध्ये 4000 पर्यटक वाहतुकीची क्षमता होती. नवीन टर्मिनलमुळे ही संख्या 11,000 वर गेली असून आता कोणीही वेळी 10 विमाने येथे उभी करता येतील असे या विमानतळ विस्ताराच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले. यामुळे उड्डाणांची संख्या वाढेल. या भागात अधिक पर्यटक पर्यायाने नोकऱ्या येतील, असे ते म्हणाले. पोर्ट ब्लेअरच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे प्रवास सुलभता, व्यवसाय सुलभता आणि संपर्क व्यवस्था वाढेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

या प्रारूपात देशातला प्रत्येक प्रदेश, प्रत्येक समाजगट आणि आरोग्य, शिक्षण आणि दळणवळण अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार केला जातो असं ते म्हणाले. ७१० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नव्या विमानतळामुळे अंदमानमधे व्यवसायानुकूल वातावरण निर्मितीसाठी, आणि संपर्क वाढवण्याला चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या नव्या विमानतळाची क्षमता दर दिवशी अकरा हजार उतारूंची आहे. गेल्या ९ वर्षात अंदमान निकोबार बेटांसाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून अनेक पायाभूत सुविधांचा विकास आपल्या सरकारने केला असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

भाषणाचा समारोप करताना, देशाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. आज जगात अभूतपूर्व प्रगती केलेली बेटे आणि लहान किनारपट्टीवरील देशांची अनेक उदाहरणे आहेत. प्रगतीचा मार्ग जरी आव्हानांनी भरलेला असला तरी विकास सर्व प्रकारच्या उपाययोजनांसह आकाराला येतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे संपूर्ण प्रदेश आणखी मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होते. येत्या तीन चार वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या दोनशेच्या पुढं जाईल असं ते म्हणाले. विमानतळावर उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण शिंदे यांच्या हस्ते झालं.

४० हजार ८०० चौरस मीटर जागेत या विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबारमधील दळणवळणाला तसंच पर्यटनाला चालना देण्यात हा विमानतळ मोठी भूमिका बजावणार आहे. दर वर्षाला सुमारे ५० लाख प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे. या इमारतीची रचना समुद्रातील -शिंपल्यांसारखी करण्यात आली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सद्यस्थितीत राज्यात H५N१ विषाणूचा प्रादुर्भाव नाही
Spread the love

One Comment on “पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *