वजन, मापे, मानकांची पडताळणी करून घेण्याचे आवाहन

Legal Metrology Organisation, Food, Civil Supplies and Consumer Protection Department (Govt Of Maharashtra), India. legalmetrology.maharashtra.gov.in हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Call for verification of weights, measures, standards

वजन, मापे, मानकांची पडताळणी करून घेण्याचे आवाहनLegal Metrology Organisation, Food, Civil Supplies and Consumer Protection Department (Govt Of Maharashtra), India. legalmetrology.maharashtra.gov.in हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पुणे : सामान्य ग्राहकांना अचूक वजन व मापाने वस्तू अथवा सेवा देण्याच्या दृष्टीने सर्व व्यापारी, औद्योगिक प्रतिष्ठान तसेच इतर वजने, मापे वापरकर्त्यांनी त्यांच्याकडील वजने, मापे व मानकांची पडताळणी व मुद्रांकन करून घ्यावे, असे आवाहन उप नियंत्रक वैध मापन शाखा पुणे यांनी केले आहे.

वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व मानके यांची पडताळणी व मुद्रांकनाची कामे केली जातात. काही वजने वा मापे यांचे उपयोगकर्ते हे त्यांच्याकडील वजन व माप यांची पडताळणी व मुद्रांकन करून न घेता वापर करत असल्याचे यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. अशा उपयोगकर्त्यांची माहिती संकलित करण्याकरिता वजने व मापे यांची दुरुस्ती करणाऱ्या परवानाधारकांना प्राधिकार पत्रे देऊन विहित नमुन्याप्रमाणे सर्वेक्षण करण्याकरीता वैधमापन शास्त्र यंत्रणेने प्राधिकृत केले आहे.

वजने, मापे पडताळणी व मुद्रांकन न करता वापरात आहेत अशा उपयोगकर्त्यांनी जवळच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यालयामध्ये संपर्क करून, वजने मापे पडताळणी व मुद्रांकन करून घ्यावे. तसेच सर्वेक्षणाकरता प्राधिकार पत्र घेऊन येणाऱ्या परवानाधारकास सहकार्य करावे, असेही सह नियंत्रक वैध मापन शास्त्र यांनी कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं निधन
Spread the love

One Comment on “वजन, मापे, मानकांची पडताळणी करून घेण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *