आज देशभरात ‘विजय दिवस’ साजरा

Vijay Diwas

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाने 1971 च्या युद्धातील शहीद वीरांना विजय दिवसानिमित्त वाहिली आदरांजली

या वीरांचे बलिदान देशासाठी प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत: राष्ट्रपती

देश या शूर सैनिकांचा सदैव ऋणी राहील : उपराष्ट्रपती जगदीप धनखड
सैनिकांच्या निःस्वार्थ समर्पण आणि अतूट संकल्पाने देशाचे रक्षण केले आणि गौरव मिळवला – पंतप्रधान
आजचा दिवस त्यांच्या विलक्षण शौर्याला आणि अटल भावनेला आदरांजली वाहण्याचा -: नरेंद्र मोदीVijay Diwas

विजय दिवस आज साजरा होत आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धात भारतानं आजच्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत ९३ हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं बिनशर्त शरणागती पत्करली, दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी शरणागती ठरली. यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की :

“कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या शौर्यकथा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात आणि या कथा राष्ट्रीय अभिमानाचे स्रोत आहेत”.

सशस्त्र दलांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करताना, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही वीर सैनिकांचे शौर्य आणि निःस्वार्थ बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान असल्याचे वर्णन केले आणि देश त्यांच्या सेवेचा सदैव ऋणी राहील, असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय दिवसानिमित्त शूर सैनिकांना अभिवादन केले.

X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात त्यांनी लिहिले:

“आज, विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही 1971 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिलेल्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करत आहोत. त्यांच्या निःस्वार्थ समर्पण आणि अतुट संकल्पाने आपल्या देशाचे रक्षण केले आणि आपल्याला गौरव मिळवून दिला. हा दिवस त्यांच्या विलक्षण शौर्याला आणि त्यांच्या अविचल आत्म्याला अभिवादन करण्याचा आहे. त्यांचे बलिदान भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देईल आणि आपल्या देशाच्या इतिहासात अमिट राहील.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलाच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम केला. राजनाथ सिंह म्हणाले की, सैनिकांचे धैर्य आणि देशभक्तीमुळे देश सुरक्षित राहिला. या सैनिकांचा त्याग आणि सेवा देश कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले.

विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना आदरांजली वाहिली.

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि नौदल उपप्रमुख -ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनीही माल्यार्पण करून शहीद वीरांना आदरांजली वाहिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन

Spread the love

One Comment on “आज देशभरात ‘विजय दिवस’ साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *