ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Vijaystambha felicitation ceremony विजयस्तंभ अभिवादन सोहळा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Greetings from Deputy Chief Minister Ajit Pawar at the historic Victory Pillar

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनVijaystambha felicitation ceremony विजयस्तंभ अभिवादन सोहळा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे :  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिगंळे, अतिरिक्त आयुक्त दिनेश ढोके, समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, उपायुक्त वृषाली शिंदे आदी उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस अॅडमिरल बी शिवकुमार यांनी स्वीकारला युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून कार्यभार
Spread the love

One Comment on “ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *