वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार

Inauguration of Bankatswamy Sadan at Alandi by the Deputy Chief Minister उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

5 crores will be given to Warkari Education Institute

वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार

 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पणInauguration of Bankatswamy Sadan at Alandi by the Deputy Chief Minister
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोळ, संतोष महाराज सुले पाटील, भालचंद्र नलावडे, तुषार भोसले, माजी आमदार योगेश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पेाहोचविण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचविण्याचे कार्य केले जाते.

सर्व प्रकारच्या वेदांना मुठमाती देत ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम,अमंगळ’ हा ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेने दिला आहे. संस्थेला १०० वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत करण्याचे कार्य होत आहे. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळाराम मंदीर, नाशिक दौऱ्यावर असतांना वारकरी शिक्षण संस्थचे विद्यार्थ्यांसोबत भजन साधना केली; त्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

बंकटस्वामी सदनात राज्यभरातील विद्यार्थ्यांची सोय

सदरचे विद्यार्थी वसतिगृह दोन मजली असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ७७४.४० चौरस मीटर आहे. एकूण २० खोल्याचे स्वच्छतागृह सह बांधकाम करण्यात आले आहे. या वसतीगृहासाठी शासनाने १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून तळ मजल्यावरील एकूण १० खोल्याचे तर संस्थेच्या निधीतून पहिल्या मजल्यावरील एकूण १० खोल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेत राज्यभरातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांची येथे निवासाची सोय झाली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सहकारी बँकांनी विकास आणि विस्तारासोबत ग्राहक हित जपावे
Spread the love

One Comment on “वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *