राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण परिषदेचे आयोजन

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Organization of a one-day state-level women empowerment conference at Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक दिवसीय राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण परिषदेचे आयोजन

राज्यातील विविध महाविद्यालयातील ५०० महिला प्राध्यापिका सहभागी होणार Savitribai Phule Pune University

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण परिषद “संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण” सोमवारी (२३ ऑक्टोबर २०२३) आयोजित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या या परिषदेत राज्यातील विविध महाविद्यालयातील ५०० महिला प्राध्यापिका सहभागी होणार आहेत.

विधान परिषदेच्या उपसभापती मा. ना. डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. विकासचंद्र रस्तोगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या परिषदेत सहभागी महिला अध्यापकांना महिला सक्षमीकरण समन्वयक अथवा महिला सक्षमीकरण दूत(Ambassador for Woman Empowerment) म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. दिवसभर दोन सत्रात होणाऱ्या या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी महिला अध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत. श्रीमती ना.दा.ठा महिला विद्यापीठाच्या मा. कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि महिला सक्षमीकरणावर’ मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या श्रीमती अंजू उप्पल या महिला अध्यापकांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच प्राचार्या डॉ. अस्मिता हुद्यार यांचे ‘समभावावर बोलू काही’ हे मार्गदर्शनपर सत्र होणार आहे. न्यूझीलँड ट्रेड ॲण्ड एन्टरप्रायजेस इंडिया बिचहेडस ॲडव्हायझरचे अध्यक्ष श्री. रामानन, डॉ. प्रज्ञा सरवदे, एडीजी महाराष्ट्र पोलिस तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वरिष्ठ विधी अधिकारी ॲड. परवीन सय्यदही सहभागी महिला अध्यापकांचे मार्गदर्शन करणार आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सीआरपीएफच्या ‘यशस्विनीं’नी दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *