Women’s empowerment, is an important investment for the present and future of the world
महिला सक्षमीकरण, ही जगाचे वर्तमान आणि भविष्य यासाठीची महत्वाची गुंतवणूक : उपराष्ट्रपती
लैंगिक समानता आणि महिला प्रणित विकास ही न्याय्य आणि प्रगतीशील समाजाची मूलभूत तत्वे आहेत : उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
नवी दिल्ली : “महिला सक्षमीकरण ही, जगाचे वर्तमान आणि भविष्य यासाठीची गुंतवणूक आहे” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
नवी दिल्लीत भारत मंडपम इथे, फिक्कीच्या महिला संघटनेला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. “समान संधी देण्यास प्रोत्साहन देतांना, तसेच, जुन्या अनिष्ट प्रथा परंपराचे अडथळे दूर करत, महिलांचा आवाज आणि त्यांची कार्यसिद्धी अधिकाधिक जोरकसपणे मांडतांना, आपण एका अशा समाजाची उभारणी करतो आहे, जो केवळ अधिक न्याय्य आणि समताधिष्ठित नाही, तर एक समृद्ध आणि शाश्वत समाज असेल.” असे उपराष्ट्रपती म्हणाले.
लैंगिक समानता आणि महिला प्रणित विकास ही न्याय्य आणि प्रगतीशील समाजाची मूलभूत तत्वे असल्याचे महत्व अधोरेखित करत, उपराष्ट्रपतीनी लैंगिक दृष्ट्या समान व्यवस्थेची भलामण केली
लैंगिक न्याय आणि शाश्वत विकास यांच्यातील अविभाज्य दुवा अधोरेखित करताना धनखड म्हणाले की, “लैंगिक न्याय आणि महिलांचा आर्थिक न्याय ही शाश्वत विकास साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे”. जेव्हा अधिक महिला काम करतात, तेव्हा अर्थव्यवस्था अधिकाधिक विकसित होते.असे त्यांनी पुढे सांगितले.
महिला आर्थिक राष्ट्रवादाच्या स्वाभाविक दूत असतात, असं सांगत, धनखड यांनी सर्वांना आर्थिक राष्ट्रवादाचे पालन करण्याचे आवाहन केले.”कोणताही देश जोपर्यंत त्यांच्या सर्व पैलू आणि क्षेत्रांमधे राष्ट्रवाद आणि संस्कृतीप्रतीची दृढ बांधिलकी जोपासत नाही, तोपर्यंत तो देश आपला विकास करू शकत नाही”, असे मत त्यांनी मांडले.आर्थिक राष्ट्रवाद हा विकासाचा मूलभूत पाया आहे,असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला फिक्की महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुधा शिवकुमार, सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा