‘यशस्विनी’ ही सीआरपीएफच्यावतीने आयोजित महिला मोटारसायकल रॅली मुंबईतून रवाना

Maharashtra Women and Child Welfare Minister Aditi Tatkare flagged off the rally महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दाखवला रॅलीला हिरवा झेंडा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Yashaswini’, a women’s motorcycle rally organized by CRPF, leaves from Mumbai

‘यशस्विनी’ ही सीआरपीएफच्यावतीने आयोजित महिला मोटारसायकल रॅली मुंबईतून रवाना

महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दाखवला रॅलीला हिरवा झेंडा

मुंबई : केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) वतीने आयोजित यशस्विनी महिला मोटारसायकल रॅली आज मुंबई येथून गुजरातच्या दिशेने रवाना झाली.

महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून त्यांना मार्गस्थ केले. याप्रसंगी गणेश, कोळी नृत्य, स्व-संरक्षण, शिवकालीन युद्धकला तसेच घूमर नृत्य यांचे सादरीकरण झाले.Maharashtra Women and Child Welfare Minister Aditi Tatkare flagged off the rally
महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दाखवला रॅलीला हिरवा झेंडा
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

या रॅलीच्या माध्यमातून सीआरपीएफमार्फत समाजात महिलांचे महत्व तसेच महिला सशक्तीकरण वाढवण्याच्या हेतूने ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाबाबत जनजागृती निर्माण करण्यात येत आहे.

यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कु.जीविका यादव, कु. युक्ता कांबळे (चेंबूर), कु.कस्तुरी देसाई (प्रभादेवी), कु. इशान्वी गुंडाळे (भायखळा) आणि कु. ज्ञानदा तेरवणकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप माहिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

समाजात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी यशस्विनी रॅली हे सीआरपीएफचं एक सकारात्मक पाऊल आहे. बेटी बचाओ, बेटी पाढाओ योजनेचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील, असे प्रतिपादन आदिती तटकरे यावेळी केले .

यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबईच्या आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस महानिरीक्षक एस. रणपिसे, पोलीस उपमहानिरीक्षक चंद्र भूषण, पोलीस महानिरीक्षक वैभव निंबालकर, 102 बटालियन कमांडंट जतिन किशोर यांच्यासह अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

सीआरपीएफची महिला रॅली ही संपूर्ण देशभरात दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून श्रीनगर (जम्मू कश्मीर), शिलांग (मेघालय) आणि कन्याकुमारी (तामिळनाडू) या तीन ठिकाणांहून सुरू झाली आहे.

या रॅलीची सांगता एकता स्मारक, केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 ला होईल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको
Spread the love

One Comment on “‘यशस्विनी’ ही सीआरपीएफच्यावतीने आयोजित महिला मोटारसायकल रॅली मुंबईतून रवाना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *